

Goregaon Mulund Link Road Project Tunnel
ESakal
मुंबई : मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत, गोरेगावमधील दादासाहेब फाळके फिल्म सिटीमध्ये ५.३ किलोमीटर लांबीचा, तीन पदरी जुळा बोगदा बांधला जात आहे. कामासाठी आवश्यक असलेल्या दोन अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) पैकी एकाचे सर्व घटक जागेवर पोहोचले आहेत. ऑगस्ट २०२६ मध्ये प्रत्यक्ष उत्खनन सुरू झाल्यानंतर कामाला आणखी वेग येईल.