

Palghar Goods Train Accident
ESakal
पालघर : गेल्या काही दिवसांपासून लोकलमधून पडून, किंवा रेल्वे पकडताना अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना पालघरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.