Tiger Group Viral Vieo : किंग नाही किंगमेकर... टायगर ग्रुपचे मुंबई पोलिसांनाच आव्हान ? कारच्या टपावरील हुल्लडबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Tiger Group : नागरिकांनी या हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून व्हिडिओची तपासणी सुरू असून गाडीच्या नंबरवरून शोध घेतला जात आहे. राज्यभरातील अशा घटनांवर पोलिस कारवाई करत असूनही हुल्लडबाजीच्या घटना थांबत नाहीत.
Tiger Group members seen sitting on a moving car roof on Mumbai’s Western Express Highway, creating chaos and risking lives as police begin probe.

Tiger Group members seen sitting on a moving car roof on Mumbai’s Western Express Highway, creating chaos and risking lives as police begin probe.

esakal

Updated on

Summary

  1. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी केली.

  2. “मी किंग नाही, किंगमेकर आहे” या गाण्यावर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  3. कार्यकर्त्यांनी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंट केल्याची टीका होत आहे.

राज्यातील अनेक भागांत पोलिस हुल्लडबाजांवर कारवाई करताना दिसत आहेत. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी रस्त्यात राडा करण्याऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना अद्दल घडवली होती तर पु्ण्यातील हडपसर परिसरात एका भाईची धिंड काढली होती. मात्र तरीह हुल्लडबाजी करुन दहशत पसरवण्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com