esakal | वीज बिल जास्त येतं? मग तज्ज्ञांच्या ७ टीप्स फॉलो करा

बोलून बातमी शोधा

light bill
वीज बिल जास्त येतं? मग तज्ज्ञांच्या ७ टीप्स फॉलो करा
sakal_logo
By
तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उन्हाचा पारा वाढत असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. बहुतांश सर्वजण घरातून काम करत असल्याने यंदाही विजेचा वापर वाढणार आहे. त्यामुळे विजेची बिलेही अधिक येणार हे निश्चित आहे. विजेचा काटकसरीने वापर केल्यास वीज बिल कमी येईल, असा सल्ला वीज तज्ज्ञ देत आहेत. गत वर्षी लॉकडाउनमध्ये ग्राहकांना वीज वितरण कंपन्यांनी सरासरी वीज बिले पाठविल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही परिस्थिती यंदा निर्माण होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने विशेष काळजी घेतली असली तरीही ग्राहकांनी वीज बिल कसे कमी करावे याबाबत वीज तज्ञ प्रताप होगडे यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

उन्हाचा चटका वाढल्याने साहजिकच पंखा, एसीचा, कूलरचा वापर वाढेल. याचा परिणाम विजेच्या बिलावर होणार आहे. त्यामुळे विजेचा वापर काटकसरीने केल्यास वीज बिल कमी होण्यास नक्की मदत होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

वीज बिल कमी करण्याच्या काही टीप्स

1) फ्रीझचा दरवाजा वारंवार उघडणे टाळावे. फ्रेजमध्ये गरम पदार्थ ठेऊ नये.

2) वॉशिंग मशिन टायमर मोडवरच वापरावी.

3) गरज नसेल तेव्हा घरातील लाईट्स बंद करा.

4) घरातील जुन्या बल्बमुळे विजेच्या बिलात भर पडते. त्याऐवजी सीएफएलचा बल्ब वापर केल्याने वीजबिल नक्कीच कमी होईल. झिरो वॉल्टचा बल्बमुळे सुमारे दहा वॉल्टची वीज खर्च होते. त्यामुळे कंप्म्युटर, टी.व्ही. चे पॉवर बटण गरज नसेल तेव्हा बंद करा.

हेही वाचा: कोविड रुग्णांना प्राधान्यक्रमाने मिळणार होम डिलिव्हरी; Zomato ची खास ऑफर

5) संगणक, टी.व्ही. रात्रीच्या वेळेस चालू ठेवल्यास वीजेचे बिल वाढेल. घरातील उपकरणे पॉवर एक्सटेंशनला जोडून घ्या. कारण विजेचा लोड एकदम वाढल्यास उपकरण जळण्याचा धोका कमी होतो.

6 ) आटोमॅटिक मोड असलेली इस्त्री वापरावी. त्याचे टेम्प्रेचार सतत बदलू नये. कपड्यांवर पाणी मारून इस्त्री वापरू नये.

7) मिक्सरमध्ये सुके पदार्थ वाटू नयेत. ओले पदार्थ वाटल्यास वीज बचतीला मदत होते.

स्वतःच पाठवा मीटर रिडींग

कोरोना काळात रिडींग न घेता बिले पाठविल्याच्या तक्रारी गट वर्षी अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे यंदा ग्राहकांना स्वतः मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे पाठविण्याची व्यवस्था महावितरणने करून दिली आहे. यामुळे मीटर रिडींगशिवाय बिले पाठविण्यात आल्याच्या आरोपातूनही महावितरणची सुटका होणार आहे.

संपादन : शर्वरी जोशी