ठाणे : लसीचा एकही डोस न घेतलेल्याना TMT नो इन्ट्री ; ठाणे पालिकेचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane

ठाणे : लसीचा एकही डोस न घेतलेल्याना TMT नो इन्ट्री ; ठाणे पालिकेचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : एकीकडे लोकल प्रवासासाठी दोन डोसची सक्ती आणि दुसरीकडे संपामुळे एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले असताना ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्येही लशीचा एकही डोस न घेतलेल्यांना प्रवेश मिळणार नाही. ठाण्यातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोविड १९ ची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थ‍ितीत लस हाच एकमेव उपाय असून सर्वत्र लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: इंदापुरात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात आला 'हा' अनोखा उपक्रम

ठाण्यातदेखील लसीकरण मोहीम सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे व एकमेकांपासून दुसऱ्याला संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांना परिवहनच्या टीएमटी बसमधून प्रवेश देण्यात येईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास जवळ बाळगणे गरजेचे आहे.

loading image
go to top