esakal | श्रमिक मुक्ती संघटनेतर्फे, तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

श्रमिक मुक्ती संघटनेतर्फे, तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती संघटनेतर्फे मुरबाड (Murbad) तहसीलदार (Tehsildar) कार्यालयावर आज धरणे आंदोलन (Dharaṇe) करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची दुरुस्ती करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा कृषी विभागाच्या मार्फत कामे सुरू करावीत, गणपती सणापूर्वी लाभार्थींना देय असलेले रेशन धान्यवाटप करावे, गॅसजोडणी नसलेल्या कुटुंबांना रेशनवर रॉकेल वितरण त्वरित सुरू करावे आदी मागण्यांचे निवेदन मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांना देण्यात आले. त्यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: राज्य शासन तसेच लातूर पोलिसांना खंडपीठाची नोटीस

तसेच शंभर रेशन कार्डाची ऑनलाईन नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढली. श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे, जयवंत कवठे, नवसू वाघ, परशुराम पारधी आदींसह अनेक आदिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते.

loading image
go to top