esakal | सरसकट लोकल सुरू करण्यासाठी प्रवाशांचे 'ई-मेल' आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

सरसकट लोकल सुरू करण्यासाठी प्रवाशांचे 'ई-मेल' आंदोलन

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास (local travel) सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. आंदोलनासाठी (protest) सज्ज असलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून नोटीस पाठविली जाते. जमावबंदीमुळे कायदेशीर कारवाई (legal action) करण्यात येईल, असे नोटीसमधून प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे आता प्रवाशांनी लोकलसाठी 'ई-मेल' आंदोलन (e-mail protest) सुरू केले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना ई-मेलद्वारे सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

एप्रिल 2021 पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुरूवातीला छुप्या पद्धतीचा वापर काही प्रवाशांकडून केला जात होता. मात्र, ओळखपत्र तपासणीला आणि तिकिट तपासणीला वेग आल्याने लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना, विविध पक्षांद्वारे लोकल सुरू करण्यासाठी आंदोलने सुरू केली. मात्र, शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलिसांकडून नोटीस पाठविली जात आहे. जर, प्रवाशांनी आंदोलन केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असा इशारा नोटीसमधून दिला जातोय. त्यामुळे प्रवाशांनी आता, थेट राज्य सरकार, रेल्वे प्रशासनाला लोकल सुरू करण्यासाठी ई-मेल केले जात आहे.

हेही वाचा: Olympics : पदार्पणात लवलिनाला कांस्य; भारताच्या खात्यात तिसरे पदक

लोकल सुरू करण्यासंदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक या ट्विटर खात्यावरून सांगण्यात आले की, आतापर्यंत राज्य सरकारने चिन्हित केलेल्या लोकांना लोकलच्या प्रवासाची परवानगी रेल्वेनी दिली असून, रेल्वे आपल्या एकूण क्षमतेच्या 90% पेक्षा जास्त क्षमतेने गाड्या चालवित आहे. आणि मुख्य मार्गिकेवरून 97% पेक्षा जास्त गाड्या चालवित आहे. यामध्ये सरसकट परवानगीसाठी राज्य सरकारला निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती दिली.

हेही वाचा: ऑलिम्पियन प्रवीण जाधवच्या 'वादात' साताऱ्याच्या नेत्यांची उडी!

जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास सुरु करण्याचे म्हणणे सरकार, प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी 'ई-मेल' आंदोलन करण्याची कल्पना सुचली. ज्या सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सुरू व्हावी असे वाटत असेल, त्यांनी सरकार, प्रशासनाला मेल पाठविला पाहिजे.

- कमलेश बोनवटे, प्रवासी

आंदोलन केल्यास तुम्ही गप्प राहा, नाहीतर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा धमकी वजा इशारा प्रशासन देते. बाहेरील राज्यातून आलेले लोक यांना चालतात. त्यांना प्रवासाची मुभा आहे. टाळेबंदीच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, ते नवीन नोकरीच्या शोधासाठी लोकलचा वापर करत आहेत, परंतु, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाते. आयटीआय प्रशिक्षण केंद्रही सुरू झाले आहे. या विद्यार्थ्यांना तिकिट मिळत नाही. लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला बाहेर देशात, राज्यात फिरायला परवानगी आहे, परंतु लोकलमधून सामान्य माणसाला प्रवास करायलाच बंदी, असा हा अजब प्रकार राज्यात सुरू आहे. राजकीय समारंभांमध्ये सर्रास नियमांचे उल्लंघन होते. एकूणच घरचा माणूस मेला तरी चालेल, पण बाहेरील पाहुण्यांचा पाहुणचार आम्ही करणार, असाच प्रकार सध्या राज्यात सुरू आहे.

- दिनेश घरत, कोषाध्यक्ष, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन

मुख्यमंत्री महोद्य, आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार, लोकल बंद आहेत. बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी आहे.

संदीप देशपांडे, मनसे नेते

राज्यपाल rajbhavan@maharashtra.gov.in

मुख्यमंत्री cm@maharashtra.gov.in

महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे gm@cr.railnet.gov.in

महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे gm@wr.railnet.gov.in

विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे drm@bb.railnet.gov.in

विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे drm@bct.railnet.gov.in

loading image
go to top