इंधनाचा पाचव्यांदा भडका, मुंबईत पुन्हा पेट्रोल 34 तर डिझेल 37 पैशाने महागले

प्रशांत कांबळे
Tuesday, 26 January 2021

मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईत पेट्रोल 34 पैशाने तर डिझेल 37 पैशाने वाढले आहे. गेल्या महिन्याभरात ही पाचवी दरवाढ आहे.

मुंबई:  गेल्या तीन दिवसांपासून स्थिर असलेले इंधनाचे दर पुन्हा कडाडले आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईत पेट्रोल 34 पैशाने तर डिझेल 37 पैशाने वाढले आहे. गेल्या महिन्याभरात ही पाचवी दरवाढ असून, पेट्रोल 92.62 रुपये झाले तर डिझेल 83.3 रुपये झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झाले असताना, देशात मात्र, एकाच महिन्यात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 18 आणि 19 जानेवारीला पेट्रोलच्या दरात तब्बल 48 पैसे तर डिझेल दरामध्ये 53 पैशांची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांमध्ये पेट्रोल पुन्हा 48 पैसे आणि 53 पैशाने डिझेल वाढल्याने 18 जानेवारी पूर्वी असलेले पेट्रोलचे 91.32 रूपये प्रतिलीटर दर शनिवारी थेट 92.28 रूपयांवर तर डिझेल 81.6 रूपयांचा दर 82.66 रूपयांवर पोहचले होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर मंगळवारी पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी देशातील चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी सर्वात जास्त पेट्रोल, डिझेलचा दर मुंबईत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुंबईतील पेट्रोलचा दर 92.62 रूपये आहे. त्याप्रमाणे चेन्नई 88.60, दिल्ली 86.5, कोलकात्ता 87.45 रूपये तर झिझेलच्या दरांमध्ये मुंबई 83.3 रूपये, त्याप्रमाणे चेन्नई 81.47, दिल्ली 76.23, कोलकाता 79.83 रूपये दर होते. 

हेही वाचा- Republic Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Today Mumbai Fuel price Petrol Rs 92.28 per litre diesel above Rs 83


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Mumbai Fuel price Petrol Rs 92.28 per litre diesel above Rs 83