पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आडोशी ते फुडमॉल ठरतोय ‘ब्लॅकस्पॉट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Pune Express way
बागायत जमिनी खारभूमी क्षेत्रात

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आडोशी ते फुडमॉल ठरतोय ‘ब्लॅकस्पॉट’, जाणून घ्या कारण

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगतीवरील अपघातांची मालिका पाहता आडोशी ते फुडमॉल हा पट्टा अपघातांसाठी ‘ब्लॅकस्पॉट’ ठरत आहे. मंगळवारी (ता. १५) खोपोली एक्झिटजवळ सहा वाहनांचा अपघात झाला. त्यात अवजड वाहनेच निष्पाप जिवांचा कर्दनकाळ ठरली. या भीषण अपघातात सोलापूर येथील कॉंग्रेसच्या नेत्यासह त्यांच्या तीन मित्रांचा बळी गेला. हा अपघात हा ब्रेक निकामी झाल्याने झाल्याचे बोलले जात असले तरी वाहनांचा अतिवेग, लेन कटिंग आणि मार्गावर वाहनांना आलेला अडथळा हाही तितकाच कारणीभूत ठरला आहे. (Mumbai Pune Express way accident blackspot)

आडोशी ते फुडमॉल दरम्यानचा पट्टा हा अपघाताचे केंद्र ठरत आहे. द्रुतगतीवरील मुंबई कॉरिडॉर कडील किलोमीटर क्र. ४० ते ३६ या केवळ चार किलोमीटरच्या पट्ट्यात सहा महिन्यांत जीवघेण्या अपघातांमध्ये सतरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तीव्र उतार, वळण आणि अवजड वाहने कर्दनकाळ ठरत आहे.

या पट्ट्यात होणाऱ्या अपघातांची कारणे
- ब्रेक न लागणे, नादुरुस्त होणे, टायर फुटणे यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या संख्येत वाढ
- तीव्र उतारावर वाहनचालक अनेकदा ब्रेकचा अती वापर करीत असल्याने लायनर गरम होऊन ब्रेक फेल होतात
- इंधन वाचविण्यासाठी काही वेळा वाहने न्यूट्रल केली जातात, त्यामुळे वेगात ब्रेक लागत नाही
- वेगामुळे वाहनावर नियंत्रण राखता न आल्याने अवजड वाहनांनी छोट्या वाहनांना धडक दिल्याने जीवघेणे अपघात होतात
- या पट्ट्यात सध्या द्रुतगती मार्गाचे काम सुरू असून, सुरक्षेच्या उपायांअभावी अपघातांना मिळतेय निमंत्रण

हेही वाचा: जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला सुंदर फोटो


उपाययोजना ठरताहेत तकलादू
- द्रुतगती मार्गावरील गेल्या तीन वर्षांतील अपघातांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाण निम्म्यावर आले. मात्र, गेल्या काही अपघातांतील मृतांचे आकडे चिंताजनक
- रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनी, महामार्ग पोलिस यांच्या वतीने महामार्गावर माहितीदर्शक व दिशादर्शक फलक, रोड स्टड, स्पीड गण, सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याही ठरताहेत तकलादू
- सध्या महामंडळाच्या वतीने बोरघाटात मिसिंग लिंक प्रकल्पासह द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासह वेळेची बचत करणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उतार कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

‘‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर बनविण्याच्या दिशेने यंत्रणांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी वेगमर्यादा उपायांचा वापर, वाहनांवर इलेक्ट्रॉनिक निगराणी, वाहनचालकांना विशेषतः: अवजड वाहन चालकांना प्रशिक्षण देणे आदी पर्यायांचा वापर करता येऊ शकतो. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.’’
- पियुष तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन

हेही वाचा: Video: पुण्यातला ऐतिहासिक भिडे पूल इतिहासजमा होणार?

अपघातांची संख्या
सन २०१८
जीवघेणे ः ९६, मयत ः ११०
गंभीर अपघात-७२, जखमी- १५१
किरकोळ अपघात- १६ जखमी-२३

सन २०१९
जीवघेणे अपघात ः ७४, मृत्यू ९२
गंभीर अपघात ः ६७ जखमी १६२
किरकोळ अपघात ः २७, जखमी ३१

सन २०२०
जीवघेणे अपघात ः ६२, मृत्यू ६७
गंभीर अपघात ः ३८, जखमी ७९
किरकोळ अपघात ः १२, जखमी १३

आडोशी ते फुडमॉल या पट्ट्यात झालेल्या दुर्घटना
- १ जुलै २०२१ ः भरधाव कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांना धडक; वसईतील एकाच परिवारातील तीन सदस्यांचा मृत्यू
- २७ सप्टेंबर २०२१ ः अवजड टेलरवरील रिळ मोटारीवर पडल्याने मोटारीचा चेंदामेंदा; घटनेत चालकाचा जागीच मृत्यू
- १८ आक्टोबर २०२१ ः सात वाहने एकमेकांवर आदळली; यामध्ये तिघांचा मृत्यू, सहा जखमी
- १२ डिसेंबर २०२१ ः भरधाव बसची मिक्सरसह ट्रकला धडक; अपघातात द्रुतगतीवरील कामगारासह तिघांचा मृत्यू, १५ जखमी
- १७ डिसेंबर २०२१ ः ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ट्रकचालकाचा मृत्यू


अपघाताची प्रमुख कारणे
- ओव्हर स्पीडिंग
- धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग
- दारू पिऊन गाडी चालवणे.
- वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक/ओव्हर लोडिंग
- ड्रायव्हिंग कौशल्याचा अभाव आणि वाहतूक शिस्तीचे अपुरे ज्ञान
- चालकांचा थकवा
- महामार्गावर येणारे अडथळे, मार्गातील नादुरुस्त वाहने
- तांत्रिक बिघाड, टायर फुटणे

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top