Aniket Tatkare
Aniket Tatkaresakal media

मुस्लिम समाज सभागृहासाठी मोठा निधी प्राप्त करून देणार - अनिकेत तटकरे

पाककला स्पर्धेत मुस्लिम महिलांचा मोठा सहभाग

मुरूड : मुरूड पेठ मोहल्ल्यातील साडेसात गुंठे जागेत मुस्लिम समाजासाठी (Muslim Community) सभागृह आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने जागेचा विस्तार करण्याची मागणी होती. आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी सभागृह विकसित करण्यासाठी जागेचे योग्य नियोजन आणि आराखडा तयार करा, असे निर्देश दिले. प्रस्तावित सभागृहासाठी मोठा निधी देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी मुरूड तालुका राष्ट्रवादी पक्षातर्फे (NCP) पाक कला स्पर्धेतील महिलांना तटकरे यांनी मार्गदर्शन केले.

Aniket Tatkare
अजित पवारांच्या शब्दाला काही किंमत नाही, आधिवेशनाआधी फडणवीसांची टीका

तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, नगरसेवक अविनाश दांडेकर, नगरसेविका रिहाना शहाबंदर, मुरूड तालुका महिला अध्यक्ष मृणाली खोत, सचिव विजय पैर, प्रमिला माळी, मुस्लिम महिला अध्यक्ष नगमाना खानजादा, मुग्धा दांडेकर उपस्थित होते. पाककला स्पर्धेत ११२ महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत स्वीट डिश बनवणे यामध्ये प्रथम क्रमांक कुलसुम अर्फात खानजादा, द्वितीय क्रमांक समीरा खुरर्म दामाद, तृतीय क्रमांक शबनम शहाबाज ददनाक यांनी पटकाविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com