ड्रग्स फार्मा प्रकल्पाच्या जमीन संपादनातील गैरप्रकार

ड्रग्स फार्मा प्रकल्पाच्या जमीन संपादनातील गैरप्रकार

मृत व्यक्तीच्या जमीन विक्री प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. ७ : मृत व्यक्तीच्या जागी दुसरी तोतया व्यक्ती उभी करून जमीन विक्रीचा गैरप्रकार कोकबन येथे उघडकीस आला आहे. ‘सर्वहारा जनआंदोलन’ने पुढाकार घेतल्याने या प्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रस्तावित बल्क ड्रग्ज फार्मा प्रकल्पाच्या हद्दीतील कोकबन येथील गणेश कोल्हटकर यांचे पणजोबा हशा नागू कोल्हटकर यांचा १९७५ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून कोल्हटकर कुटुंबीयांची जमीन विकण्यात आली. याबाबत गणेश कोल्हटकर यांनी सर्वहारा जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि धक्कादायक प्रकरण समोर आले. तक्रार करूनही रोहा पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही. या गंभीर प्रकरणाकडे खुद्द जिल्हाधिकारी रायगड, पोलिस अधीक्षक रायगड यांचे लक्ष वेधले. तसेच प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानुसार गुरुवारी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. गणेश कोल्हटकर यांच्या फिर्यादीनुसार भगवान घोडे, गिरीश सिनकार यांसह सहा जणांवर १८६० च्या कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७ ४६८, ४७१ व ३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com