Caste Certificate Verification Workshop in Alibag
Caste Certificate Verification Workshop in Alibagsakal

अलिबागमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त लिबागमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी एकदिवसीय कार्यशाळा

अलिबाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता कार्यक्रम संपूर्ण राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत अलिबागमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी एकदिवसीय कार्यशाळा मंगळवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजता अलिबागमध्ये होणार आहे.

सामाजिक समता कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर बहुविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अकरावी आणि बारावी (विज्ञान) या वर्गात शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी व त्यांच्या पालक यांच्यासाठी जनजागृतीसाठी जेएसएम महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. इच्छुक सर्व नागरिकांनी या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com