WHATS APP
WHATS APP Team eSakal

व्हाट्सअप ग्रुपवर महिला शिक्षिकेबाबत आक्षेपार्ह लिखाण; शिक्षकाचा उद्दामपणा

किन्हवली : व्हॉट्सअप ग्रुपवर (What's app group) महिला शिक्षकेची बदनामी एका शिक्षकाकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित शिक्षक महिलेविषयक जातीवाचक शेरबाजी (Offensive statement) व्हॉटसअप ग्रुपवर करत आहे. तसेच रात्री-अपरात्री इतर शिक्षकांना धमकीचे मेसेजसुद्धा (Threats messages) करतो आहे. त्यामुळे दोषी शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयवंत वाघ (Jaywant wagh) यांनी शहापूरचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

WHATS APP
पुरोगामी विचार रूजविण्याचे संतांचे कार्य : थोरात

शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील खरीवली (सो) केंद्रातील कातकरीवाडी नंबर दोन या प्राथमिक शाळेतील नानासाहेब महादेव सोलनकर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते महिलांना जातीवाचक शेरेबाजी करत इतर शिक्षकांनासुद्धा मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोलनकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. खरीवली(सो) केंद्राचे केंद्रप्रमुखांनी व्हॉट्सअपवर ‘प्रशासकीय ग्रुप खरीवली-सो’ असा ग्रुप बनविला आहे. त्यामध्ये केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षण विभागातील काही अधिकारी यांना समाविष्ट केले आहे.

परंतु सोलनकर हा शिक्षक या ग्रुपवर प्रशासकीय माहिती न पाठवता ग्रुपमधील सदस्यांना मानसिक त्रास होईल असे मेसेज पाठवत असतो. केंद्रातील महिला शिक्षिकांना त्यांच्या शारीरिक रंग-वर्णावरून अपमान करणे, ‘‘मी साहेबाचा साहेब आहे, मी तुमच्या सर्वांचा बाप आहे, माझी वरपर्यंत ओळख असून माझे कुणीही काही करू शकत नाही,’’ असे धमकी देणारे मेसेज पाठवत असतो. तसेच व्हॉट्सअप स्टेटस ठेवत असतो. दरम्यान, तक्रारदार शिक्षकांना भेटून त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदी न घेता विस्तार अधिकारी यांनी फक्त शिक्षक सोलनकर व केंद्रप्रमुख यांनाच भेटी दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर शिक्षण विभागाने ३ जानेवारीला ज्ञापन पत्र देऊन ४८ तासांच्या आत खुलासा करण्यास बजावले होते. शिक्षण विभागाकडून त्या शिक्षकाला ज्ञापन पत्र दिले असून त्याबाबत त्यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली असून सोमवारी अहवाल प्राप्त झाल्यावरच त्यानुसार कारवाई करण्यात येईल. - बी. टी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, शहापूर. ज्यांच्याबद्दल व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह लिहिले होते त्यावर लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्या भगिनींच्या जातीचा उल्लेख करून अपशब्द लिहिले होते त्या सर्व समाजाची लेखी माफीनामा देऊन माफी मागणार आहे. - नानासाहेब सोलनकर, प्राथमिक शिक्षक, कातकरीवाडी, शाळा नं २.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com