school starts
school startssakal media

वसई-विरार पालिकेतील शाळा-महाविद्यालयांची घंटा वाजणार

वसई : वसई-विरार पालिका (Vasai-virar municipal corporation) क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा (school-colleges starts) गुरुवारी (ता. २७) सुरू करण्यात येणार आहेत. तसा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा कोरोनाच्या परिस्थितीनुरूप (corona situation) नंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

school starts
केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक; पुज्जापुरा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल २६२ कैद्यांना बाधा

शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासाला मुलांना सामोरे जावे लागत असताना शाळांची दारे उघडणार असल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, तसे असले तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी संस्थाचालक व शिक्षकांना सांभाळावी लागणार असल्याने प्रवेश करताच तापमान, सॅनिटायझर व सामाजिक दुरीकरण अशा जबाबदाऱ्या काटेकोरपणे पाळाव्या लागणार आहेत. मुलांना आरोग्याविषयी काही तक्रारी जाणवत आहेत का, याची माहिती दप्तरी ठेवावी लागणार आहे.

शाळेत येणाऱ्या मुलांनी गर्दी करू नये याकडे शाळांचे लक्ष असणार आहे. विरार पालिका क्षेत्रात जिल्हा परिषद अंतर्गतच्या १२० शाळा, वरिष्ठ महाविद्यालय ४, कनिष्ठ महाविद्यालय ३६, दिव्यांग शाळा सात, खाजगी शाळा ७५२ कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ९४ हजार २८९ इतकी असून त्यापैकी इयत्ता पहिली ते ७ वी मध्ये २ लाख ६४ हजार ३५२ इतके विद्यार्थी व इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी मध्ये एक लाख २९ हजार ९३७ इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या एकूण ७६ हजार ८२६ इतकी आहे.

school starts
महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे उतरले; एक लाखाहून अधिक कुटुंबांना नळ जोडणी

त्यापैकी ५८ हजार ७५८ लाभार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी ७६ टक्के इतकी आहे. पालिकेचे पथक ठेवणार लक्ष्य शालेय शिक्षण विभागाचे नियमावलीच्या अंमलबजावणी अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये तपासणीकरिता पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. पथकामध्ये शिक्षण विभाग, मनपा वैद्यकीय आरोग्य विभाग, सहाय्यक आयुक्त स्तरावरील कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.

शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची आवश्यकतेनुसार आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्याही करण्यात येणार आहे. लसीकरणाचे आवाहन वसई-विरार पालिकेकडून शाळा स्तरावर लसीकरणाची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे. कोव्हॅक्सीन लसीचे २१ हजार ७५० डोस तर ‘कोव्हीशिल्ड’ लशीचे ७६ हजार डोस शिल्लक आहेत. गुरुवारी ८ वी ते १२ वी वर्ग सुरू करण्याची दक्षता सर्व संस्थाचालक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी करावी, असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com