electric power
electric powersakal media

शहापूर : १२ आदिवासी गाव-पाडे अजूनही मुख्य रस्त्यांपासून व विजेपासून वंचित

आदिवासी पाडे विकासाच्या प्रतीक्षेत; रस्ता, वीज अजूनही पोहचली नाही

खर्डी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपण आता ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) बुधवारी साजरा करणार आहोत. प्रजासत्ताकाच्या इतक्या वर्षांनंतरही शहापूर तालुक्यातील आदिवासी पाडे (Tribal Village) मूलभूत सोयी-सुविधांपासून (Basic Facilities) दूर आहेत. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील १२ आदिवासी गावपाडे मुख्य रस्त्याला जोडले गेले नाहीत. या पाड्यांवर पोहण्यासाठी रोज नागरिकांना सात ते आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

electric power
भाईंदर : मालमत्ता कर माफीचा ठराव बहुमताने मंजूर; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

शिवाय या गावांवर वीजदेखील पोहचली नाही. महाराष्ट्र सरकारच्या एकूण अर्थसंकल्पापैकी एकूण ९ टक्के निधी हा आदिवासी समाजाच्या सुखसोई व उत्कर्षासाठी वापरला जातो. आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात; मात्र आजही आदिवासी बांधवांना मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. तालुक्यातील बोरशेती-लोभीपाडा (लोकसंख्या ४७८), साकडबाव - तळ्याचीवाडी (५५), अघई- ठाकूरपाडा (७४२), वेहलोंडे- सापटेपाडा (३३५), अस्नोली-तईचीवाडी (३७२), टेंभा- आंबिवली (१०४), कोठारे- वेटा (१८६), फुगाळे- वरसवाडी (१०२), अजनूप- दापूरमाळ, शिरोळ- सावरकुट व उंब्रई - कातकरी वस्ती येथील रस्ते खाचखळगे, दगड धोंड्याचे असल्याने येथील रहिवाशांना खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेत येण्या-जाण्यासाठी धडपडत सात ते आठ किलोमीटरची रोज पायपीट करावी लागते.

तर पावसाळ्यात येथील रस्त्यावर चिखल व पाणी जमा झाल्याने येथील संपर्क तुटत असतो; तर काही रस्त्यांची कामे वनविभागाच्या अटीमुळे अर्धवट अवस्थेत बंद केल्याने पूर्ण होत नाहीत; तर काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आदिवासी पाड्यावरील रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी करीत आहेत. हे पाडे अंधारात शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी पाडे आजही वीजजोडणी नसल्याने काळोखात असून त्यांचे जीवन अंधःकारमय झाले आहे. अंधारात आहे. तालुक्यातील फुगाळे- वरसवाडी, पिवळी नळाची वाडी, अजनुप - दापूरमाळ व साकुर्ली- साकुर्लीवाडी ही आदिवासी पाडे आजही अंधारात आहेत.

शहापूर तालुक्यात सर्वात जास्त आदिवासी लोकप्रतिनिधी असूनही येथील रस्त्यांची व विजेची समस्या सोडवली जात नाही. त्यामुळे काही आदिवासी गाव-पाडे रस्ते व विजेपासून वंचित आहेत. यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी श्रमजीवी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभे करेल. - प्रकाश खोडका, सचिव, श्रमजीवी संघटना, शहापूर तालुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com