Marriage
Marriageesakal

नवी मुंबई : एमबीए तरुणाने घातला 35 तरुणींना लाखोंचा गंडा

Summary

नवी मुंबईतील तरुणीला लाखोंचा गंडा विशाल चव्हाणकडून ३० ते ३५ तरुणींची फसवणूक

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : लग्न जुळविणाऱ्या साईटवरून ३० ते ३५ तरुणींची आर्थिक फसवणूक करणारा विशाल चव्हाण ऊर्फ अनुराग (३२) याने नवी मुंबईतील कोपरी भागात राहणाऱ्या तरुणीचीही (२७) फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एपीएमसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Marriage
महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा भोंदूबाबा अटकेत

आरोपी विशालला मुंबई पोलिसांनी नुकतीच अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. डोंबिवलीत राहणारा विशाल चव्हाण हा उच्चशिक्षित असून, त्याने बीटेक, एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्‍याने लग्न जुळविणाऱ्या साईटवर वेगवेगळ्या नावाने प्रोफाईल तयार केले होते. त्यात तो परदेशातील एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असल्याची माहिती टाकत होता. त्यामुळे भावी पतीचा शोध घेणाऱ्या तरुणी त्याच्या जाळ्यात फसत. लग्नासाठी इच्छुक काही तरुणींना तो मागणी घालून ओळख वाढवायचा. त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की, लग्नाचे भूलथापा मारून वेगवेगळे कारण सांगून त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा.

वाशीतील कोपरी भागात राहणारी २७ वर्षीय तरुणी देखील त्याच्या जाळ्यात डिसेंबर २०२० मध्ये अडकली होती. तिला विशालने लग्नाचे प्रलोभन दाखविले. तिच्या कुटुंबीयांशी लग्नाची बोलणी करून विश्वास संपादन केला. त्यानंतर तरुणीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडून तिच्याकडून २ लाख ८३ हजाराची रक्कम उकळली. तरुणीने शेअर बाजारात लावलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता, बेटिंगमध्ये पैसे लावल्‍याचे व त्यात त्याला ५० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. तरुणीला भावनिक बोलण्यात गुंतवून तिच्याकडून आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. तरुणीला शंका आल्याने तिने विशालकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली, मात्र त्याने टाळाटाळ केली. २५ ते ३० लाखांची फसवणूक गत आठवड्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशाल चव्हाणला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याचे बिंग फुटले.

Marriage
Video: दिल्लीत माणुसकीला काळीमा, बलात्कार पीडितेची धिंड

त्यानंतर तरुणीने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्‍याने आतापर्यंत ३० ते ३५ तरुणींची फसवणूक करून २५ ते ३० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशालविरोधात १०-१२ महिलांनी पोलिसांत तक्रारी केल्या असल्या तरी त्याने ३० ते ३५ महिला व तरुणींची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे चव्हाण याच्या हातून फसल्या गेलेल्या महिला व तरुणींनी देखील समोर येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com