pregnant woman vaccination
pregnant woman vaccinationsakal media

मुंबई : ७ महिन्यांत केवळ साडेपाच हजार गर्भवतींचे लसीकरण

मुंबई : गेल्या सात महिन्यांत साडेपाच हजार गर्भवती महिलांना (pregnant woman) कोरोना प्रतिबंधक लशीची (corona vaccination) मात्रा देण्यात आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने (bmc health authorities) दिली. यात २७०० गर्भवतींना लशीची पहिली मात्रा आणि २९०० गर्भवतींना लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. शहरातील पालिका रुग्णालयांत (bmc hospital) वर्षभरात साधारण एक लाख २५ हजार गर्भवती महिलांची नोंद होते. त्या तुलनेत ५,६०० अधिक गर्भवती महिलांनी लस घेतल्याची आकडेवारी फारशी आशादायक नसल्याचे मत पालिका आरोग्य विभागाने व्यक्त केले.

pregnant woman vaccination
''ED च्या नावाने केंद्रीय मंत्र्यांना धमकी देणं शोभतं का?''

गर्भवती महिलांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत आतापर्यंत केवळ २.१६ टक्के गर्भवतींना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. २.३२ टक्के गर्भवतींना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. शहरात २०२१ पासून गर्भवतींचे लसीकरण सुरू झाले आहे. त्याआधी मे महिन्यात स्तनदा मातांचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, गर्भवती महिला प्रतिसाद देत नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला मुंबईत ९२ लाख ३५ हजार लोकांना लसीकरणासाठी पात्र ठरवण्यात आले होते, त्यात गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आला होता; पण पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीमध्ये गरोदर महिलांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, की मुंबईत दर वर्षी १.२५ लाख गर्भवती महिलांची रुग्णालयात नोंद होते. या संख्येच्या तुलनेत केवळ ४.४८ टक्के गर्भवतींना लशीची मात्रा देण्यात आली आहे.

pregnant woman vaccination
मुंबई - खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून मागितली खंडणी; एकाला अटक

आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलांमध्ये लशीबाबत आधीच साशंकता आहे. लशीपासून गर्भाला धोका होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे या महिला लस घेत नाहीत. त्याच वेळी रोज २०० ते ३०० गर्भवतींचे समुपदेशनही केले जाते.

आलेख घसरलेला का?

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, बहुतेक महिलांनी सुरुवातीला एक-दोन महिन्यांची गरोदर असताना त्यांचे लसीकरण सामान्य श्रेणीत केले आहे. त्यामुळे या गर्भवती महिलेचा लसीकरणाच्या श्रेणीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गरोदर महिलांच्या लसीकरणाच्या संख्येचा आलेख कमी दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com