अवैध रेती उपशाविरोधात प्रशासनाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० ः मुंब्रा खाडीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या रेती उत्खननाविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी (ता. ३०) करण्यात आलेल्या कारवाईत पाच बोटी, सहा बार्ज, आठ सक्शन पंप याच्यासह २५ ब्रास रेती असा चार कोटी ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती जिल्हा प्रशासने दिली.
दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व्यग्र होते. याचाच फायदा घेत मोठ्या प्रमाणात खाडी पात्रात अवैधरीत्या रेती उत्खननाला उधाण आले होते. त्याबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासानाकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा रेतीबंदर येथे ठाणे तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार वासुदेव पवार यांच्यासह तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर दगड आणि दारूच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या. यामध्ये कोणी जखमी झाले नसून चार जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---
यापुढेदेखील अशीच कारवाई सुरू ठेवणार असून चार जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा, पर्यावरणाचा ऱ्हास आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- अविनाश शिंदे, उपविभागीय अधिकारी, ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.