भाईंदर : प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व; सभापतीपदी शिवसेनेच्या अनिता पाटील | Bhayandar Political update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp
प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व

भाईंदर : प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व; सभापतीपदी शिवसेनेच्या अनिता पाटील

भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेच्या (Mira Bhayandar municipal corporation) प्रभाग समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये झालेली बंडाळी वरिष्ठ पातळीवर शमवण्यात आल्यामुळे सहापैकी पाच प्रभाग समित्यांवर भाजपचे उमेदवार विजयी (bjp candidiates wins) झाले आणि एका प्रभाग समितीमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेची नगरसेविका (shivsena corporator) सभापतीपदी विराजमान झाली. महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक पार पडली.

हेही वाचा: 'आझादी का अमृत महोत्सव'; भारतातील सर्वात मोठे सागरी जलतरण अभियान

या निवडणुकीत तीन प्रभाग समित्यांमध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली होती, तर एका प्रभाग समितीमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या नगरसेविकेने भाजपच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती. भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीवर वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आल्यामुळे पाच प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे उमेदवार सभापतिपदी निवडून आले.

यात दोन प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास गटाचे आणि तीन प्रभाग समित्यांमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता गटाचे सभापती निवडले गेले. प्रभाग समिती सहामध्ये शिवसेनेच्या अनिता पाटील या भाजपच्या पाठिंब्याने विजयी झाल्या. अनिता पाटील या मेहता गटाच्या मानल्या जातात. त्यामुळे सहा प्रभाग समित्यांवर सत्ताधारी भाजपचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpShiv Senabhayandar