Allegation of sexual harassment against Ganesh Naik mumbai
Allegation of sexual harassment against Ganesh Naik mumbaisakal

गणेश नाईक यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप

ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे वजनदार भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला.

मुंबई : ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे वजनदार भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी तपास करून दोन दिवसांत अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने दिला आहे.

यासंदर्भात तक्रारदार महिलेने दोन दिवसांपूर्वी आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे तक्रार केली आहे. या संबंधांतून आपल्याला १५ वर्षांचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे. १९९३ पासून नाईक आपले लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे प्रलोभन दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आपले लैंगिक शोषण केले.

नाईक यांच्या धमक्यांमुळे आपल्याला त्यांच्याबरोबर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहावे लागत आहे. आपल्याला वैवाहिक अधिकार मिळावेत, तसेच या मुलाला पितृत्वाचा अधिकार मिळावा, यासाठी या महिलेने नाईक यांच्याकडे सतत तगादा लावला होता; मात्र त्यावर त्यांनी महिलेला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच नाईक यांचा मुलगा संदीप हादेखील या महिलेला गणेश नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून इतरत्र निघून जाण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या देत होता, असा या महिलेचा आरोप आहे.

दोन दिवसांत अहवाल द्या!
नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा व आपल्याला पोलिस संरक्षण द्यावे, अशी तक्रार या महिलेने राज्य महिला आयोगाकडील अर्जात केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन दिवसांत याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com