11 accident prone areas in Vasai
11 accident prone areas in Vasaisakal

वसईत ११ अपघात प्रवण क्षेत्रे

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई परिसरामध्ये गेल्या तीन वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने वाहतूक विभागाने अपघातप्रवण क्षेत्रांचा सर्व्हे करत ११ ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई परिसरामध्ये गेल्या तीन वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने वाहतूक विभागाने अपघातप्रवण क्षेत्रांचा सर्व्हे करत ११ ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित केले आहेत. या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत २४९ अपघातांच्या घटना घडल्या. ही साखळी तोडण्यासाठी जनजागृती मोहीम तसेच घाई न करता वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन करणारी मोहीम वाहतूक विभागाने सुरू केली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. वसई परिसरात महामार्गालगत असणाऱ्या गावपाड्यातील नागरिकांचे रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत. मागील तीन वर्षांत अनेकांना यात मृत्यूने कवटाळले आहे. त्यामुळे अशा ठिकाणांची माहिती जमा करत वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एम. करांडे यांनी कर्मचाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यानुसार पोलिसांनी ब्लॅक स्पॉट जाहीर केले. मुंबई-अहमदाबाद महामार्ग प्राधिकरण विभागाला सूचना दिल्यानंतर या ठिकाणी ‘अपघातप्रवण क्षेत्र असून वाहने सावकाश चालवा’, असे फलक लावण्यात आले आहेत. तसेच रेडियम लावूनदेखील वाहनचालकांना सावध केले जाणार आहे.

कोरोनाकाळात मार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले; मात्र पुन्हा वर्दळ वाढल्याने अपघात पुन्हा वाढले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागाने गंभीर पावले उचलली आहेत. जनजागृती मोहिमेसह, दुचाकी वाहनचालक विनाहेल्मेट व चारचाकी सीटबेल्ट न लावता प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

येथे आहेत ब्लॅक स्पॉट
बापाणे पूल, चिंचोटी, लोढा धाम, पेल्हार, तुंगारेश्वर फाटा, रॉयल गार्डन, दुर्गा माता मंदिर, एचपी पेट्रोल पंप, किनारा ढाबा ते वर्सोवा पूल मार्ग परिसर, गोल्डन हॉटेल, वसई फाटा या महामार्गावरील ११ ठिकाणी अपघात क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

वसईच्या महामार्गावर ज्या ठिकाणी अधिक अपघात घडले आहेत, ती ठिकाणे ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आली आहेत. वाहने चालविताना चालकांनी काळजी घ्यावी. अती घाई करू नये. जनजागृती मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे.
- डी. एम. करांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

११ ब्लॅक स्पॉटवरील अपघात संख्या - २४९
वर्ष मृत्यू - जखमी
२०१९ - ६६ - ३७
२०२० - ४५- ३७
२०२१ - ३७ - ३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com