mahim west expressway connected by new road
mahim west expressway connected by new roadSakal

Mumbai News : माहीम-पश्चिम द्रुतगती मार्ग नवीन रस्त्याने जोडणार, निविदा प्रक्रिया सुरू; १,५०० कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेचा पूल विभाग माहीम ते पश्चिम उपनगराला जोडणारा नवीन रस्ता तयार करणार आहे.

Mumbai : मुंबई महापालिकेचा पूल विभाग माहीम ते पश्चिम उपनगराला जोडणारा नवीन रस्ता तयार करणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना न करता दादरसारख्या रहदारीच्या परिसरातून विनाअडथळा पश्चिम द्रुतगती मार्गावर थेट जाता येणार आहे. पूल विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया ही सुरू केली आहे. एकूण १,५०० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून सुटका तर होईलच, शिवाय प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.
माहीम कॉजवे येथील सेनापती बापट मार्ग ते पश्चिम द्रुतगती मार्ग असा हा पूल असणार आहे. हा मार्ग एकूण १०.५८ किमीचा असणार असून तो वांद्रे - वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडलादेखील जोडण्यात येणार आहे.

पुढील दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यावर एक पूलदेखील बनवला जाणार असून त्यासाठी २२० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर १८ आंतरबदलही देण्यात येणार आहेत. यावरून वांद्रे-वरळी सी-लिंक, पश्चिम द्रुतगती मार्ग, कोस्टल रोडवरदेखील जाता येणार आहे.

यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर ३० मिनिटांत जाता येणार आहे. नरिमन पॉईंट भागात येणाऱ्यांचा सुमारे ७० टक्के वेळ वाचणार आहे.

नवीन मार्गामुळे प्रवाशांना दादर-माहीम भागातून थेट मिरा-भाईंदरपर्यंत जाता येणार आहे. यासाठी मिठी नदीवर एक पूल बांधावा लागणार आहे. हा मार्ग वेगवेगळ्या प्राधिकरणांसह खारफुटी भागातूनही जाणार आहे. यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. परवानग्या घेण्याची जबाबदारी ही ठेकेदारावर देण्यात आली आहे.

याशिवाय अतिक्रमण किंवा इतर काही कारणांमुळे रस्त्यांच्या कामात उशीर झाला, तर त्याची जबाबदारीही ठेकेदारावर देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com