Mumbai: मुंबईत कोविड रुग्णांमध्ये झाली घट; पण नियमांचे पालन आवश्‍यक

Mumbai Covid JN.1
Mumbai Covid JN.1sakal

गेल्या आठवडाभरात मुंबईत कोविडची प्रकरणे वाढलेली नसून आता त्यात घट होताना दिसत आहे. यावर टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले की, आता आपल्याला १० दिवसांच्या कोविड संसर्गाचे विश्लेषण करण्याची गरज आहे.

यामुळे उच्च जोखीम असलेल्या लोकांनी जोखीम घेऊ नये, तसेच कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते ७ जानेवारीदरम्यान राज्यात ८९५ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.(mubai covid news )

Mumbai Covid JN.1
Mumbai Covid News : मुंबईत कोवीड रुग्णांच्या संख्येत वाढ ; एका आठवड्यात गाठली शंभरी

तसेच ८ ते १४ जानेवारीदरम्यान ६६२ लोक कोरोनाग्रस्त आढळले. यावरून रुग्णसंख्या वाढलेली नाही, हे दिसून येते. दोन आठवड्यांची आकडेवारी पाहून कोणत्याही निष्कर्षावर येणे योग्य नाही. तसेच अनेकांमध्ये रोगाची सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांची चाचणी होत नाही, असेही डॉ. रमण म्हणाले.(mumbai covid news latest)


येत्या काही दिवसांत रुग्ण कमी होतील, हे निश्चित; पण त्यासाठी कोविडची प्रकरणे कमी होतात की वाढतात, हे १० दिवस पाहावे लागेल. उच्च जोखीम असलेल्या लोकांनी म्हणजे वृद्ध, आजारी व्यक्तींनी मास्क घालावे आणि इतरांनी कोरोना नियमांचे पालन करावे.(covid )

Mumbai Covid JN.1
Mumbai Covid Center Scam: मुंबई कोव्हीड सेंटर घोटाळ्याबाबत मोठी अपडेट: 'त्या' पत्रावर आयुक्त अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com