‘नारीशक्ती दूत’ ॲप चालेना!

‘नारीशक्ती दूत’ ॲप चालेना!
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : लाडकी बहीण योजनेचे  नारीशक्ती दूत  ॲप  चालेनासे झाले आहे. योजनेचे अर्ज अपलोड करण्यात अडचणी येत असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस उजाडूनही ऑनलाइन नोंदणी सुरळीत झालेली नाही. योजनेला होत असलेला विरोध, तसेच ४६ हजार कोटींच्या तरतुदीवर कॅगने ठेवलेले बोट या पार्श्वभूमीवर  लाडकी बहीण योजना बंद होणार  का, असा सवाल करून बोरिवलीतील प्रमेय फाउंडेशनतर्फे ॲड. रुमाना बगदादी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (ता. ३०) न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. लाडकी बहीण  योजनेचे नारीशक्ती दूत  ॲप सुरुवातीपासून नीट चालत नव्हते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून  ॲप ठप्प झाले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
----
दोन कोटी महिलांची नोंदणी!
लाडकी बहीण योजनेची ऑनलाइन नोंदणी ढेपाळली असताना अंगणवाडी सेविका तसेच पालिकेच्या वॉर्डमधील कर्मचारी ऑफलाइन अर्ज स्वीकारत नाहीत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यावर  योजनेचे संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू असल्याची माहिती  महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी दिली. तसेच, आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांनी नोंदणी केल्याची  माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com