
वीज वितरणाची महिलांवर जबाबदारी
उपनगरात टाटा पॉवरच्या तेजस्विनी समूहाची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : टाटा पॉवरकडून मुंबई उपनगरात सुमारे साडेसात लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जात आहे. त्यापैकी अंधेरी ते वांद्रेदरम्यानच्या सुमारे ४० चौरस किलोमीटरच्या भागातील वीज यंत्रणेची सुरक्षा, देखभाल, नेटवर्क इंजिनिअरिंग, ग्राहकांशी संपर्क साधने अशी वेगवेगळी कामे महिलांच्या माध्यमातून केली जात आहेत. त्यासाठी तेजस्विनी समूह म्हणून महिलांची टीम तयार करण्यात आली आहे.
वीज वितरणामध्ये नवकल्पना राबवतानाच महिलांना सक्षम करण्यासाठी टाटा पॉवरकडून सातत्याने प्रयत्न केले जातात, त्याचाच भाग म्हणून टाटा पॉवरने आपल्या मुंबई वितरण विभागामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या ‘तेजस्विनी समूहा’सोबत समावेशकता आणि संचालनातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन दिले आहे. या समूहाच्या सर्व सदस्य महिला असून त्या वितरण विभागाच्या अर्बन झोनमध्ये महत्त्वाच्या पॉवर युटिलिटी कामांची देखरेख करतात. त्यानुसार अंधेरी-वांद्रेदरम्यान हा महिला कर्मचाऱ्यांचा समूह कार्यरत असून त्या भागात सुरळीत वीजपुरवठा होत राहावा, यासाठी ‘तेजस्विनी समूह’ विविध उपकरणांची वेळोवेळी देखभाल करण्याची योजना तयार करते. परिणामी, वीजवितरण कार्यक्षमतेत मोठी सुधारणा झाल्याचे टाटा पॉवरने सांगितले. याशिवाय टाटा पॉवरने मुंबईमध्ये घाटकोपर, खार, बोरिवली आणि अंधेरीमध्ये चार महिला ग्राहक संपर्क केंद्रे (सीआरसी)देखील सुरू केली आहेत. या केंद्रांचा संपूर्ण कारभार महिलांच्या प्रशिक्षित टीमकडून केला जातो, नवीन वीजजोडणी, बिलिंग आणि समस्यांचे निवारण इत्यादी सर्व सेवा या महिलाच प्रदान करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.