Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna Shastri esakal

Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमात सोन्याच्या दागिन्यांची लुट

मिरा रोड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले

भाईंदर : मिरा रोड येथे सुरू असलेल्या धीरेंद्र कृष्ण्श शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या दिव्यदर्शन कार्यक्रसाठी आलेल्या ३६ महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच मंगळसूत्रांची चोरी झाली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.

Dhirendra Krishna Shastri
Crime News : मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, व्यवस्थापकासह सात तरुणी ताब्यात

१८ व १९ मार्चदरम्यान मिरा रोड येथील एस. के. स्टोन परिसरात बागेश्वर धाम सरकार यांच्या दिव्यदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यभरातून हजारो भक्तगण आल्याने एकच गर्दी उसळली. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पहिल्याच दिवशी तब्बल ३६ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या तसेच मंगळसूत्रांची चोरी केली.

Dhirendra Krishna Shastri
Jalgaon Crime News : हॉटेल कस्तुरी जवळून विद्यार्थिनीचे अपहरण; MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कार्यक्रम संपल्यानंतर महिलांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली. चोरट्यांनी एकंदर ४४८ ग्रॅम वजनाचे सोने लुटले आहे. दरम्यान याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच एक सोन्याची साखळीदेखील परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले राजस्थान येथील चोरांच्या टोळीचे सदस्य असून अशा धार्मिक व गर्दीच्या कार्यक्रमात लोकांचे दागिने लुटण्याची त्यांची पार्श्वभूमी आहे.

Dhirendra Krishna Shastri
Dhule Crime News : लग्नासाठी आलेल्या बालकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली, असून साध्या वेशातील पोलिसही गस्त घालत आहेत तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांनाही योग्य व्यवस्था राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिरा रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com