Gautami Patil
Gautami Patilsakal

Gautami Patil : गौतमीचा कार्यक्रम, आयोजकांना पडला महागात

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना चांगलेच महागात पडले आहे.

नालासोपारा - प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना चांगलेच महागात पडले आहे. परवानगीच्या अटी-शर्तीचा भंग केल्याप्रकरणी आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारच्या खार्डी गावचे प्रभाकर पाटील यांनी घरच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गुरुवारी (ता. २५) आपल्या घराच्या समोरील मैदानात गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची प्रभाकर पाटील यांनी रितसर परवानगीही घेतली होती. रात्री ७ ते १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार होता; मात्र गौतमी पाटील रात्री साडेआठच्या नंतर आल्‍यामुळे कार्यक्रम ९ वाजता सुरू झाला.

Gautami Patil
Crime News : दारुच्या नशेत मित्राची हत्या! अटकेनंतरही झिंगाट, पोलिसांना म्हणाले 20 ची द्या...

पालघर जिल्ह्यात गौतमी पहिल्यांदाच आली असल्याने तिच्या चाहत्यांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे तिचे नृत्य पाहत रात्रीचे ११ कधी वाजले हे चाहते आणि आयोजकांना कळलेच नाही. १० च्या नंतर पोलिसांनी दोन वेळा कार्यक्रम बंद करण्याची विनंतीही केली होती; परंतु कार्यक्रम लांबत गेल्यामुळे ११ वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी माजी खासदार बळीराम जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक सदानंद पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावली होती.

आम्ही अटी-शर्ती ठेवून गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. १० ची वेळ संपली असताना आम्ही कार्यक्रम बंद करत होतो, पण आमचे न ऐकता पुन्हा कार्यक्रम सुरू ठेवला. त्यामुळे अटी-शर्तीच्या नियमानुसार दिलेल्या परवानगीचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

- प्रफुल वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com