Rain
Rain esakal

Mumbai : चाळी-झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांबरोबरच छोट्या-मोठ्या दुकानदारांना पावसाळ्यात होणारी गळती टाळण्यासाठी...

सध्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यामुळे झोपड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही काही रहिवासी, मासे विक्रेते, भाजी विक्रेते, दुकानदार, बांधकाम ठेकेदार इत्यादींना पावसाळ्यात ताडपत्रीची गरज भासते.

प्रभादेवी - मुंबईत सध्या सर्वच पातळीवर पावसाळापूर्व तयारीच्या कामांना वेग आला आहे. विविध चाळी आणि झोपडपट्यांमध्ये पावसामुळे होणारी गळती थांबावी म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ताडपत्रीची खरेदी सुरू झाली आहे. घराच्या छतावर ताडपत्री टाकण्याची लगबग सुरू झाली आहे.

Rain
Pune Theater : पुणे शहरातील नाट्यगृह सुधारणेचा ‘प्रयोग’; विविध कामांसाठी कोट्यवधींचा निधी

चाळी-झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांबरोबरच छोट्या-मोठ्या दुकानदारांना पावसाळ्यात होणारी गळती टाळण्यासाठी ताडपत्रीचा मोठा आधार वाटतो.
सध्या दादर, परळ, धनमिल नका इत्यादी परिसरात अनेक रंगांतील आणि विविध आकारांतील टिकाऊ ताडपत्री वा ग्रीन नेट विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

वाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने यंदा ताडपत्रीच्या किमतीही वाढल्या आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना त्याची झळ पोहचू शकते. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या निरनिराळ्या आकाराच्या आणि कमी-जास्त जाडीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी उपलब्ध असून खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Rain
Mumbai Crime News: महिलेने सहकाऱ्यांसोबत मिळून केली 14 कोटींची फसवणूक अन्...

सध्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यामुळे झोपड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही काही रहिवासी, मासे विक्रेते, भाजी विक्रेते, दुकानदार, बांधकाम ठेकेदार इत्यादींना पावसाळ्यात ताडपत्रीची गरज भासते. त्यामुळे खरेदीसाठी नेहमीच ग्राहक येत असतात, असे विक्रेते अरुण गुप्ता यांनी सांगितले.

Rain
Mumbai : एमएसआरडीसी पावसाळी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार

जीएसएमनुसार ताडपत्रीचा दर : २.५० ते ४ रुपये प्रति-चौरस फूट
साध्या काळ्या-पांढऱ्या (पारदर्शक) ताडपत्रीचा दर : ३० ते ८० रुपये मीटर
ग्रीन नेट : ३० ते ९० रुपये मीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com