Death
Deathsakal

Shahapur News : शहापुरात गेल्या तीन वर्षांत १३९ बालमृत्यू २४ मातामृत्यू

गेल्या तीन वर्षांत शहापूर तालुक्यात विविध कारणांनी १३९ बालमृत्यू व २४ मातामृत्यू झाल्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

शहापूर - गेल्या तीन वर्षांत शहापूर तालुक्यात विविध कारणांनी १३९ बालमृत्यू व २४ मातामृत्यू झाल्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि बेरोजगारी, बालमृत्यू व मातामृत्यूला कारणीभूत असल्याने या असुविधांकडेदेखील त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

जिल्ह्यातील आदिवासीबहुल असलेल्या शहापूर तालुक्यात विविध आजारांसह बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्यासाठी मुख्यत्वे करून रोजगार उपलब्ध करणे, तसेच रस्त्यांच्या सुविधा निर्माण करणे यांसह शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक गरजेच आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तालुक्यातील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यात अपयश आले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Death
Wrestler : बुचडे कुस्ती अकादमीच्या कुमार पैलवानांनी भारतीय संघात आपली जागा केली पक्की

जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती यांसह विविध आजारांमुळे तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गेल्या तीन वर्षात १०२ अर्भक व एक ते सहा वर्षे वयोगटातील ३७ असे एकूण १३९ बालमृत्यू झाले आहेत; तर रस्त्यांची असुविधा, रोजगाराअभावी गरोदरपणात प्रसूतीपर्यंत रोजंदारीत करावे लागणारे काम यामुळे उद्‌भवलेल्या विविध गुंतागुंतीच्या कारणांमुळे घरी आठ व विविध रुग्णालयात १६ असे एकूण २४ मातामृत्यू झाल्याची नोंद शासन दरबारी आहे.

गरोदर मातांना उच्च रक्तदाबामुळे येणारे झटके, सेप्टिसिमिया, रक्तस्राव, इन्फेक्शन आदी कारणांमुळे मातामृत्यू झाले आहेत.

- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com