Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi sakal

Loksabha: मावळ लोकसभेसाठी आघाडीत रस्सीखेच; नक्की कोणाला मिळणार उमेदवारी?

Maval loksabha Election: मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. अशातच शेकापच्या गोटातून अतुल म्हात्रे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे.


मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. २००९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन बाबर विजयी झाले होते. बाबर यांच्या विजयात शेकापचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत. २०१४ मधील निवडणुकीत शेकापने बारणे यांच्याविरोधात लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली होती.

Mahavikas Aghadi
Loksabha Election: भिवंडी लोकसभेसाठी कुणबी उमेदवार देण्याची मागणी

शिवसेनेच्या फुटीनंतर श्रीरंग बारणे हे शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड येथील संजोग वाघेरे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. तसेच खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याची चर्चा असताना शेकापने म्हात्रे यांचे नाव पुढे करून या मतदारसंघात आघाडीत-बिघाडी होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत अतुल म्हात्रे
अतुल म्हात्रे हे शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. पेशाने ते आर्किटेक्चर आहेत. लंडन येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. नैना, मुंबई ऊर्जा, विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पाविरोधात व स्थानिकांच्या बाजूने म्हात्रे उभे राहिले आहेत. सरकारदरबारी प्रकल्पावर चर्चा केली आहे. वस्तुस्थितीची कागदपत्रावर मुद्देसूद मांडणी केली आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत तालुक्यात शेकापसमर्थक शेतकरी वर्गातून अतुल म्हात्रे यांच्या नावाला पाठिंबा मिळत आहे.

Mahavikas Aghadi
Loksabha Election 2024 : सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसची खेळी; जाहीरनाम्यासंदर्भात घेतला 'हा' निर्णय

शेकापची मते निर्णायक
मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघात शेकापची सुमारे दोन लाख मते आहेत. सांगोला, तासगाव, इस्लामपूर, कोल्हापूर, गंगाखेड, कंधार, काटोल, गडचिरोली, उस्मानाबाद या विधानसभा मतदारसंघात शेकापचे अस्तित्व आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शेकापची मते निर्णायक मानली जातात. अशातच अतुल म्हात्रे यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यासाठी नैना प्रकल्पबधित उत्कर्ष समितीने शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे.

राजकीय अस्थिरतेमुळे दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उठावामुळे मूळची शिवसेना, राष्ट्रवादी यांची मावळ लोकसभा मतदारसंघात पीछेहाट झाली आहे. मतांचे विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय या मतदारसंघात काँग्रेसची ताकद नसल्यामुळे पनवेल, उरण कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतांच्या जोरावर शेकापने लोकसभेच्या तिकिटावर दावा केला आहे.

अतुल म्हात्रे यांनी लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे, यासाठी नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे; पण उमेदवारी कुणाला द्यायची, याचा निर्णय आघाडीचे नेते घेतील.
- राजेश केणी, चिटणीस, पनवेल तालुका, शेकाप

Mahavikas Aghadi
Loksabha Elections 2024: Bhawana Gawali राज्यात परतणार? लोकसभा सोडण्याची का दाखवली तयारी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com