Pollution Impact
Pollution Impactsakal

Pollution Impact: प्रदूषणाने कोमेजतेय मुलांचे मानसिक आरोग्य!

काही मुलांना शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे, थकल्यासारखे वाटते. मनाचा थकवा, स्क्रिझोफेनिया इत्यादी समस्या जाणवतात. कामातील गुणवत्ता कमी होते. फक्त मानसिक आजार होतात, असे नाही; तर दैनंदिन जीवनात परिणाम होऊन कार्यक्षमतेचेही नुकसान होते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.

दिवसेंदिवस शहरातील प्रदूषण वाढत आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका चिमुकल्यांना बसत आहे. प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात.

प्रदूषणामुळे धोकादायक वायू श्र्वसनाच्या मार्गातून शरीरात प्रवेश करतात. काही प्रमाणात ते रक्तात मिसळतात आणि मेंदूतही प्रवेश करतात. परिणामी मुलांच्या मानसिक आरोग्याला ते घातक ठरत आहे. प्रदूषित हवेत कार्बन मोनोऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडसारख्या वायूंचा समावेश आहे.

हृदयावरील नियंत्रण कमी होण्यासारख्या समस्या त्यामुळे उद्‍भवतात. प्रदूषणाचा सर्वाधिक धोका एक वर्षाच्या खालील मुलांना असतो. दूषित हवेमुळे तणाव आणि चिंता वाढते. त्यामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Pollution Impact
Koradi Pollution: कोराडी प्रदूषणासाठी गुन्हे दाखल करण्याचा इशारा! उच्च न्यायालयाचे महाजेनकोवर एफडीजी यंत्रणेवरून ताशेरे

वायुप्रदूषणामुळे लहान मुलांच्या विकासात अडचणी येतात. जी मुले जास्त काळ प्रदूषणाच्या संपर्कात येतात त्यांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतो. ते टाळण्यासाठी लहान मुलांचे वायुप्रदूषणापासून संरक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. मुलांची योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सहा महिन्यांपर्यंतच्या नवजात बालकांमध्ये फुप्फुसांचा पूर्णतः विकास झालेला नसतो. अशा काळात लहान मुलांचा संपर्क जर प्रदूषित हवेशी आला तर त्यांना फुप्फुसाशी संबंधित कायमस्वरूपी आजाराची लागण होऊ शकते. हवेतील ‘पीएम २.५’ या पार्टिक्युलेट मॅटरमुळे मुलांच्या विकासात अडथळे येतात. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेतील धूळ आणि घाणीचे अतिसूक्ष्म कण, जे श्वासावाटे शरीरात जातात.

प्रदूषणाच्या ठिकाणी वाढलेल्या मुलांमध्ये विविध प्रकारचे मानसिक आजार उद्‍भवू शकतात. लहान मुलांसह मोठ्या वयोगटात कार्यक्षमता घटण्याच्या तक्रारी जास्त असतात. जड धातू, कीटकनाशके आणि अन्नातील भेसळीमुळे व्यक्तीच्या वैचारिक क्षमतेवर परिणाम होतात. एखादे कुटुंब खराब पाणी पीत असेल, गर्दीच्या ठिकाणी राहत असेल आणि कीटकनाशके वापरली जात असतील तर त्याचा परिणाम मानसिकतेवर होतो. काही मुलांना शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे, थकल्यासारखे वाटते. मनाचा थकवा, स्क्रिझोफेनिया इत्यादी समस्या जाणवतात. कामातील गुणवत्ता कमी होते. फक्त मानसिक आजार होतात, असे नाही; तर दैनंदिन जीवनात परिणाम होऊन कार्यक्षमतेचेही नुकसान होते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.

Pollution Impact
Pollution: नवी मुंबईच्या हावेचा दर्जा खालावला; नागरीकांना होत श्वसनाचा त्रास

काही अभ्यासानुसार हवेच्या प्रदूषकांचा लहानपणी प्रभाव झाल्यास भावनिक आणि वागणूक समस्या व मोठ्या कौशल्यांमध्ये विलंब होऊ शकतो. हवेच्या प्रदूषकांमुळे नैराश्य, चिंता, मानसिक आजार आणि कदाचित न्यूरोकॉग्निटिव्ह विकार, जसे की वृद्धांमध्ये डिमेन्शिया होऊ शकतो. मुलांनाही नंतरच्या आयुष्यात अशाच परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे तेरणा रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्नेहल ठमके यांनी सांगितले.

गर्भातील बाळावरही परिणाम
केवळ जन्माला आलेली मुलेच नाही, तर गर्भातील बाळांवरही प्रदूषणाचा दुष्परिणाम होतो. नवजात बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. अशा परिस्थितीत प्रदूषणाचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. तो सर्दी-पडशासारख्या ॲलर्जीच्या स्वरूपात असू शकतो किंवा त्यामुळे दमा आणि श्वासाच्या समस्यांसारखे गंभीर आजार उद्‍भवू शकतात. अशा आजारांमुळे मुलांचा मृत्यूही ओढावू शकतो. जन्मानंतरचा काळ बाळाच्या मानसिक वाढीसाठी महत्त्वाचा असतो आणि प्रदूषित घटकांमुळे त्यात अडथळे निर्माण होतात, असे वोक्हार्ट रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले.

Pollution Impact
Air Pollution : आता तुमचा स्मार्टफोन सांगणार आजूबाजूच्या हवेची गुणवत्ता; स्टार्टअप कंपनीने तयार केलं खास अ‍ॅप

जड धातू म्हणजेच शिसापासून तयार होणाऱ्या प्रदूषणाच्या सान्निध्यात राहिलेल्या मुलांना मानसिक आजार, जसे की सततची चिंता वा नैराश्य असे आजार उद्‍भवतात. शिवाय त्यांची कार्यक्षमता कमी होते.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ

हवेचे प्रदूषण मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करते. काही प्रकारचे ऑटिस्टिक स्पेक्ट्रम विकार बळावू शकतात. उच्च प्रदूषण पातळीमुळेही शिकण्यात अडचणी आणि भाषा कमतरतेबाबतचा धोकाही होतो.
- डॉ. स्नेहल ठमके, मानसोपचारतज्ज्ञ, तेरणा रुग्णालय

प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर मुलांमध्ये न्यूरो-डेव्हलपमेंटसह कॉग्निटिव्ह फंक्शनची समस्या उद्‍भवू शकते. ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.
- डॉ. सोनल आनंद, मानसोपचार तज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय

Pollution Impact
National Pollution Control Day 2023 : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com