Forts in Goa
Forts in Goasakal

Forts in Goa: पुस्तकातून उलगडणार गोमंतकीय दुर्गांचा इतिहास; ५०हून अधिक किल्ल्यांची माहिती

स्कॅन केल्यावर प्रत्येक किल्ल्याची डिजिटल माहिती मिळते.

गोवा फिरताना समुद्रकिनारे आपल्याला माहिती आहेत. मात्र गोव्यात पर्यटकांना खुणावणारे असंख्य किल्लेही आहेत.

या दुर्ग किल्ल्यांची सखोल माहिती देणारे संदीप मुळीक यांचे ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकात गोव्यातील ५० पेक्षा अधिक किल्लांच्या माहितीचा खजिना दडलेला आहे.

Forts in Goa
Viksit Bharat, Viksit Goa: मोदींनी मांडलं विकसित गोव्याचं व्हिजन; ख्रिश्चन समुदयाचा उल्लेख करत म्हणाले, एक भारत...

महाराष्ट्रातल्या दुर्ग किल्ल्यांची खडानखडा माहिती आपल्याला आहे. मात्र गोव्यातील किल्ल्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे संदीप मुळीक यांनी स्वत: फिरस्ती करून ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ हे पुस्तक लिहिले आहे.

या पुस्तकात माहितीसोबत प्रत्येक किल्ल्याच्या अंतरंगात डोकावणारी तब्बल ३०० पेक्षा अधिक छायाचित्रे, देखणी रेखाचित्रे आणि माहितीपूर्ण नकाशे आहेत. किल्ल्यांचे क्यूआर कोड हे या पुस्तकाचे खास आकर्षण आहे. ते स्कॅन केल्यावर प्रत्येक किल्ल्याची डिजिटल माहिती मिळते.

Forts in Goa
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातसत्र, दुचाकीवरील बहिण भावाचा मृत्यू

गोव्यातील सगळ्या किल्ल्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी. तसेच गोवा फिरताना पर्यटकांना हे गडकिल्ले बघण्याची इच्छा व्हावी किंवा दुर्गप्रेमींना किल्ले बघण्यासाठी गोव्याला जावेसे वाटावे हा हेतू या पुस्तकामागे आहे.


- संदीप मुळीक, लेखक

Forts in Goa
Goa Murder Case : सूचनाने लिहिलेल्या चिठ्ठीत नवी माहिती समोर, आज पोलीस रिक्रिएट करणार संपूर्ण घटनाक्रम..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com