Palghar News : दोघांच्या हत्येप्रकरणी संशयिताला १० महिन्यांनी अटक
Maharashtra News| दोन तरुणांच्या हत्येच्या गुन्ह्यात १० महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश आहे. संशयित आरोपी शिवम मिश्रा (वय २०) याने वादातून दोन मित्रांची हत्या केल्याचा आरोप आहे.
नालासोपारा येथील चहाच्या दुकानात १७ मे २०२३ रोजी शिवम मिश्रा, किसन झा (वय १८) आणि रौनक तिवारी (वय १८) या तीन मित्रांमध्ये हाणामारी झाली होती. या मारहाणीत तिघेही जखमी झाले होते. त्यावेळी रौनक तिवारी याचा मृत्यू झाला, तर किसन याच्यावर मुंबईतील रुग्णालयात, तर शिवम मिश्रा याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान किसन याचाही मृत्यू झाला होता. ही हत्या शिवम दुबे यानेच केल्याचे आचोळे पोलिसांना संशय असल्याने त्याला गुन्ह्यात संशयित आरोपी केले होते.
तसेच हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून घडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. संशयित आरोपीने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय वसई, तसेच उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शनिवारी (ता. २४) दोन स्वतंत्र पथके तयार करून शिवम मिश्रा याला १० महिन्यांच्या कालावधीनंतर शोध घेत नालासोपारा स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.