Nilesh Rane
Nilesh Ranesakal

Nilesh Rane: किरकोळ प्रकरणाला धार्मिक रंग; राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धारावी बचाव आंदोलनतर्फे करण्यात आली

Nilesh Rane: भाजप आमदार नितेश राणे यांनी एका किरकोळ प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच पोलिसांशी अरेरावी केली आहे. त्यामुळे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धारावी बचाव आंदोलनतर्फे गुरुवारी (ता. ७) करण्यात आली. यासंबंधी पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. (nilesh Rane news)

Nilesh Rane
Action on Nilesh Rane Property: पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्ता सील, पालिकेची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

संत कक्कया मार्गावरील गुल मोहम्मद चाळीच्या मागील बगीचा विभागात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा चेंडू एकाला लागल्यामुळे काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादमुळे दोन गटांत मारामारी झाली होती. दोन्ही गटांना समज देऊन पोलिसांनी काही जणांवर गुन्हेही दाखल केले होते, पण त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी धारावीत महाआरतीचे आयोजन केले.(mumbai Crime)

Nilesh Rane
Nilesh Rane-Bhaskar Jadhav यांच्यातला Chiplun मधला राडा पूर्वनियोजित? हल्ल्याआधीचा Video Viral

त्याला आमदार नितेश राणे उपस्थित होते. त्यानंतर दोन गटांपैकी हिंदू असलेल्या कुटुंबाला राणे यांनी भेट दिली आणि पोलिसांना कारवाई करण्याचे बेकायदेशीर निर्देश दिले, असा आरोप धारावी बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

परिमंडळ ५ च्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते आणि धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. याप्रसंगी ॲड. राजू कोरडे, शैलेंद्र कांबळे, संजय भालेराव, अनिल कासारे, पॉल राफेल उपस्थित होते.(maharashtra news)

Nilesh Rane
Nilesh Rane Attack News : राणे अन् ठाकरे समर्थक भिडले! चिपळूण येथे निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com