Accident News
Accident Newssakal

Accident News: विरुद्ध दिशेने प्रवास करणे जीवावर बेतले; माजी नगरसेवकाचा अपघाती मृत्यू

त्यांची पत्नी जया पेंढारी या वसई-विरार महापालिकेच्या माजी नगरसेवक आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.

Mumbai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरुद्ध दिशेने केलेला प्रवास बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी (वय ५८) यांच्या जीवावर बेतला आहे.

Accident News
Jalgaon Accident News : मशिनच्या पट्ट्यात स्कार्फ अडकून महिलेचे शीर धडावेगळे; 3 लेकरांचे मातृछत्र हरपले

बुधवारी (ता. १३) पहाटे साडेचार वाजता पेंढारी यांच्या कारला मालजीपाडा येथे दिलेल्या धडकेत पेंढारी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने नालासोपारा पूर्वेतील डॉन लेन परिसरात शोककळा पसरली आहे.(nalasopara accident News)

नालासोपारा नगर परिषद असताना श्याम पेंढारी हे नगरसेवक होते. तर त्यांची पत्नी जया पेंढारी या वसई-विरार महापालिकेच्या माजी नगरसेवक आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. (sham pendhari Accident News)

Accident News
Nashik Accident News : वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार

त्यामुळे महामार्गावर दिवसरात्र वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ते आपल्या कारमधून मुंबईवरून नालासोपाऱ्याच्या दिशेने येत होते. वाहतूक कोंडी असल्याने विरुद्ध दिशेने त्यांनी गाडी टाकली होती. (Latest Marathi news)

महामार्गावरील मालजीपाडा येथे लोढा धामजवळ ट्रकने पेंढारी यांच्या गाडीला समोरून धडक दिली. दोन्ही वाहने एकमेकांना आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पेंढारी गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Accident News
Nashik Accident News : घोटी उंबरकोन फाट्याजवळ झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com