Crime News
Crime Newsesakal

Thane Crime News: नाशिक-मुंबई रोडवर कोट्यवधीचा अवैध मद्यसाठा जप्त

कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वतयारी असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Crime News: महाराष्ट्रातून गुजरात राज्यात चाललेला पंजाब आणि अरुणाचल प्रदेशनिर्मित मद्याचा साठा ठाणे जिल्ह्यातील नाशिक-मुंबई रोडवरील कसारा नाका येथे पकडण्यात राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाला यश आले.

Crime News
Crime News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांना अटक

या कारवाईत पंजाब येथील जसपाल तरसेमलाल सिंग (५०) आणि गुरदयाल गुरदासराम सिंग (४४) या दोघांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून महाराष्ट्र बनावट विदेशी मद्याचे एकूण १ हजार ५०२ बॉक्स, दोन मोबाईल आणि ट्रक असा एक कोटी ३१ लाख ४५ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वतयारी असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Crime News
Jalgaon Crime News : मक्याच्या शेतात सव्वा एकरवर गांजा लागवड; स्थानिक गुन्हेशाखेची चोपडा मेलाण्यात कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अवैध-नकली परराज्यातील मद्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ठाणे आयुक्त डॉ. नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक-मुंबई रोडवरून परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

त्या आधारे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने सापळा रचत बुधवारी (ता. १३) रोजी ठाणे जिल्ह्यातील नाशिक-मुंबई रोडवरील कसारा नाका येथे कारवाई केली. या वेळी चालकासह अन्य एक अशा दोघांना अटक करत मद्यसाठ्यासह दोन मोबाईल फोन आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे, रिंकेश दांगट, तसेच जवान केतन वझे, नारायण जानकर, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, भाऊसाहेब कराड, विजय पाटील, सागर चौधरी यांनी पार पाडली.

Crime News
Nagpur Crime News : घरात आढळले तिघांचे मृतदेह, निमखेडा जवळील घटना; उत्तरीय तपासणीनंतर रहस्य उलगडणार!

अवैध मद्यसाठ्यावरील कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची पूर्वतयारी असल्याचे म्हणता येईल. महाराष्ट्रातून गुजरात येथे; तसेच पंजाब आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत हा मद्यसाठा जात होता. त्याला महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र, पंजाब आणि अरुणाचल प्रदेशमध्ये त्या मद्यविक्रीस बंदी नाही.
- डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, ठाणे राज्य उत्पादन शुल्क

Crime News
Nashik Crime News : तामसवाडीत अनैतिक संबंधातून पत्नीचा खून; मेव्हुण्यावरही कोयत्याने केले वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com