Dharavi News Mumbai News
Dharavi News Mumbai Newssakal

Mumbai News: धारावीत एका झोपडीच्या सर्व्हेला लागणार अर्धा तास; दिला जाणार विशेष क्रमांंक


Mumbai News: आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायापालट होणार असून सोमवारपासून (ता. १८) त्याबाबत सर्व्हेक्षण सुरू होणार आहे.

Dharavi News Mumbai News
Mumbai Local News: रविवारी मेगाब्लॉक; जाणून द्या संपूर्ण वेळापत्र

त्यानुसार लीडार सर्व्हेच्या माध्यमातून परिसराचा बेस मॅप बनवला जाणार असून प्रत्येक झोपडीला क्रमांक दिला जाणार आहे.

Dharavi News Mumbai News
Mumbai Water News: मुंबईत २४ एप्रिलपर्यंत पाच टक्के पाणीकपात

तसेच घराचा फोटो घेणे, छायाचित्रण, जागेचे मोजमाप, अक्षांश-रेखांश स्थान, कागदपत्रांची पाहणी, मालकाचे बायोमेट्रिक ठसे अशी माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे एका झोपडीचे सर्व्हेक्षणे पूर्ण व्हायला सुमारे अर्धा तास लागणार असल्याचे समोर आले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) आणि अदाणी कंपनीच्या माध्यमातून धारावीतील लाखो झोपड्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यासाठी झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी सोमवारपासून सर्व्हेक्षण केले जाणार आहे. हा डिजिटल स्वरूपाचा सर्व्हे असणार असून जेनीसीस कंपनीने तयार केलेल्या अॅपमध्ये प्रत्येकाची माहिती, घराचे पुरावे म्हणून सादर केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

Dharavi News Mumbai News
Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या; आता रात्रीच्या वेळी स्टेशनवर येणार बॅटमॅन

त्यासाठी डीआरपीपीएलच्या माध्यमातून सोमवारपासून दहा टीम आपले काम करणार आहेत. एका टीममध्ये चार कर्मचारी असणार आहेत. तसेच या सर्व्हेमध्ये संबंधित घर मालकाची संपूर्ण माहिती भरली जाणार आहे. त्यामुळे एका घराचा सर्व्हे पूर्ण करून त्याची माहिती आणि कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे सर्व्हेच्या कार्यवाहीला वेळ लागणार आहे.



पोलिस संरक्षण मिळणार


धारावीतील झोपड्यांच्या सर्व्हेक्षणासाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून डीआरपीपीएलने एक महिन्याभरासाठी १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ पोलिस अंमलदार आणि इतर पोलिस कर्मचारी पुरवावेत म्हणून पोलिस विभागाला कळविले आहे.

Dharavi News Mumbai News
Mumbai News: बोरिवलीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी तिघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com