Bharat Jodo
Bharat Jodosakal

Bharat Jodo: मोदींकडून २४ तास जनतेची लूट, खंडणी सत्र सुरू; राहूल गांधींचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय पातळीवरील खंडणी सत्र सुरू केल्याचा घणाघात त्यांनी केला | He was accused of starting an international extortion session


Thane News: ‘कोरोना महामारीत ५० लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला. मृतदेहांचे ढीग लागत होते. अशा वेळी नरेंद्र मोदी हे लस तयार करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून पैसे उकळण्यात दंग होते,’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी हे २४ तास जनतेची लूट करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खंडणी सत्र सुरू केल्याचा घणाघात त्यांनी केला. (bharat jodo nyay yatra)

Bharat Jodo
Rahul Gandhi : कोरोना काळात व्हॅक्सीन मधून पैसे उकळले; राहुल गांधी यांचा मोदींवर गंभीर आरोप

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी (ता. १६) ठाण्यात होती. यादरम्यान जांभळी नाका येथे गाडीवर उभे राहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, आमदार तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. गांधी पुढे म्हणाले, ‘कोरोना काळात लस तयार करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून पैसे उकळत असताना मोदी यांनी नागरिकांना थाळी वाजवण्यात गुंतवले होते. याबाबत कोणी बोलल्यास त्याच्या मागे अमित शहा ईडी, आयकर विभागाच्या चौकशा लावत होते. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यामातून आपण देशाला जोडत आहोत. त्याच वेळी भाजप आणि राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील लोकांमध्ये भांडणे लावत आहेत.(mumbai Bhaart Jodo Crime)

Bharat Jodo
Uddhav Thackeray कडून Arvind Sawant यांच्या नावाची घोषणा, Rahul Narvekar यांना ओपन चॅलेंज

‘प्रभू के गुण गाओ, आधी रोटी खाओ, और मर जाओ’ असा टोला गांधी यांनी लगावला. राममंदिराचा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या वेळी कोणताही शेतकरी, गरीब, आदिवासी बांधव तिथे दिसले नाहीत, दिसले ते अंबानी आणि अदानी यांच्यासह अरबपती लोक, असे सांगत ‘नफरत के बाजार में आप लोगो ने मोहब्बत की दुकान खोली’ असे सांगत राहुल गांधी यांनी भाषणाची सांगता केली.(thane crime news)


‘ईडी’, ‘सीबीआय’ची भीती दाखवून वसुली

ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांकडून कंपन्यांना कारवाईची भीती दाखवली जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकून त्या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजप खंडणी उकळते. बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्यांना देण्यात आली, त्यांच्याकडून निवडणूक रोखे स्वरूपात हप्ते घेण्यात आले. निवडणूक रोखे हे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचा पैसा घेतला आहे, असे गांधी यांनी या वेळी सांगितले.

Bharat Jodo
Rahul Gandhi : 'भारत जोडो न्याय यात्रे'त राहुल गांधींचा 'गरीबी हटाव' चा नारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com