Mumbai Airport
Mumbai Airportsakal

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर उड्डाणांत आठ टक्के वाढ

Mumbai Airport: Eight percent increase in flights at Mumbai airport | मुंबई विमानतळावरून दररोज देशांतर्गत ६८२, तर आंतरराष्ट्रीय मार्गावर २६९ विमानांची ये-जा होणार आहे.

Mumbai News : सर्वाधिक व्‍यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने यंदाचे उन्हाळी वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साप्ताहिक ‘फ्लाईट ऑपरेशन’मध्ये आठ टक्के वाढ केली आहे.

Mumbai Airport
Mumbai News: वर्षभरात जमले नाही, ते आठवड्यात जमेल का? कोर्टाने मनपाला खडसावले

उन्हाळी वेळापत्रक ३१ मार्च ते २६ ऑक्टोबरदरम्यान लागू राहणार असून आंतरराष्ट्रीय मार्गावर पॅरिस, दोहा आणि हनोई तर देशांतर्गत नव्याने सुरू केलेल्या ताश्कंदसाठी विमान फेऱ्या वाढवल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी हवाई कोंडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


विमान कंपन्यांचे साप्ताहिक वेळापत्रक इंडिगो- १,२५५, एअर इंडिया- ५३९, विस्तारा- ५१९ असे असणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनाचे बेत आखतात. वेगवान प्रवासासाठी हवाई प्रवासाला प्राधान्य दिले जाते.

Mumbai Airport
Mumbai News: चिमुकल्यांना बांधून ठेवत लाकडीपट्टीने मारहाण; पाळणाघरातील धक्कादायक प्रकार

त्यामुळे विमान प्रवाशांची संख्या वाढली असून गेल्या वर्षी मुंबई विमानतळावरून दिवसाला ८८२ विमानांची ये-जा होत होती. हीच संख्या आता ९५१ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी आठवड्याला सहा हजार ६५७ विमानांची वाहतूक होत होती,

त्यात यंदाच्या उन्हाळ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मुंबई विमानतळावरून दररोज देशांतर्गत ६८२, तर आंतरराष्ट्रीय मार्गावर २६९ विमानांची ये-जा होणार आहे.


साप्ताहिक जादा उड्डाणे


मुंबई-दिल्ली : २७
मुंबई-श्रीनगर : २८
मुंबई-अयाेध्या : १४
मुंबई-कोलकाता : ९
मुंबई-पॅरिस : विस्तारा एअरलाइन्सची पाच वेळा
मुंबई-दोहा : आकासा एअरलाइन्सची चार वेळा

Mumbai Airport
Mumbai Indians IPL 2024 : मुंबईने गळाला लावला 17 वर्षाचा वेगवान गोलंदाज? गाजवला होता 19 वर्षाखालील वर्ल्डकप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com