Crime news
Crime news esakal

Crime News: महिला पोलिस उपनिरीक्षकासह तिघांची विभागीय चौकशी

पोलिस उपनिरीक्षक काजल पानसरे, पोलिस कॉन्स्टेबल राजेश पालकर आणि सुदर्शन पुरी यांची खंडणीप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी विभागीय चौकशी सुरू केली आहे | Azad Maidan Police has launched a departmental inquiry into the extortion case against sub-inspector Kajal Pansare, police constable Rajesh Palkar and Sudarshan Puri.

Mumbai News: सराफा व्यापाऱ्याकडून कथित खंडणीप्रकरणी पोलिस प्रशासन विभागाकडून पोलिसांची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक काजल पानसरे आणि पोलिस कॉन्स्टेबल राजेश पालकर आणि सुदर्शन पुरी यांची खंडणीप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी विभागीय चौकशी सुरू केली आहे. हे पोलिस कर्मचारी आझाद मैदान पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.(latest Mumbai News)

Crime news
Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

दक्षिण मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याने खंडणी मागितल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या पोलिस कर्मचाऱ्यांनी चोरीच्या ब्रेसलेटच्या चौकशीच्या बहाण्याने तक्रारदार व्यापाऱ्याला पोलिस ठाण्यात बोलावले होते.

सराफा व्यापाऱ्याने ते अनोळखी महिलेकडून खरेदी केले होते. कथित ब्रेसलेट चोरीचे असून सराफा व्यापाऱ्याने चोरीचा माल विकत घेतल्याबाबत पोलिसांनी संशय व्‍यक्त करून कारवाई करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.(maharashtra News)

Crime news
Mumbai Local News: फलाट गाठण्यासाठी प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम

२५ हजार दिल्याचा दावा


चोरीच्या ब्रेसलेटप्रकरणी कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक काजल पानसरे यांच्याशी कथित सल्लामसलत करून कारवाई टाळण्यासाठी कॉन्स्टेबलने सराफा व्यापाऱ्याकडून ५० हजार रुपयांची मागणी केली.

तडजोडीनंतर २५ हजार रुपये देऊन सुटका केल्याचे व्‍यापार्याने लेखी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून केलेल्या प्राथमिक चौकशीअंती आरोपांत तथ्य आढळून आले. त्यानुसार काजल पानसरे, पोलिस कॉन्स्टेबल राजेश पालकर आणि सुदर्शन पुरी यांच्यावरीलची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे

Crime news
Mumbai News: एसएनडीटीत ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परिघ’ पुस्तकाचे प्रकाशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com