Railway News : रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी; सीसीटीव्हीच्या मदतीने १२१ चोरांना अटक

Railway News : रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी; सीसीटीव्हीच्या मदतीने १२१ चोरांना अटक

The RPF police of Western Railway have arrested 121 thieves with the help of CCTV cameras in the last two and a half months. Stolen property worth around Rs 44 lakh has been recovered from them.

मुंबई, ता. २३ : पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी गेल्या अडीच महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने १२१ चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४४ लाख रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. मात्र, रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोरीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी कंबर कसली आहे.

चोरांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर ३ हजार ९१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यात ४८८ कॅमेरा इनबिल्ट फेशियल रिकग्निशन सिस्टिम (चेहरा ओळखणारे) आहेत. या चेहरा ओळखणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून शंभरपेक्षा जास्त गुन्ह्यांचा छडा लावला आहे.

काही दिवसांपूर्वी अंधेरी पोस्टच्या गुन्हे प्रतिबंध आणि शोध (सीपीडीएस) पथकाने अंधेरी स्टेशनवर सीसीटीव्ही फूटेजद्वारे निरीक्षण करून एका चोराला पकडले. चौकशीदरम्यान, विनोद प्रेमचंद गुप्ता याचा चार वेगवेगळ्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. आरोपीने सुमारे ९० हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com