Accident News
Accident Newsesakal

Accident News: भिवंडीजवळ झाला विचित्र अपघात; एक ठार, नऊ जखमी

र जयेश घोडविंदे, हर्षद वेखंडे यांच्यासह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News: भिवंडी वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक, दोन दुचाकी व एका कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एका चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली.

या घटनेतील जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या अपघातात पूर्वा (वय ४) या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे; तर जयेश घोडविंदे, हर्षद वेखंडे यांच्यासह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News
Mumbai Crime : मुंबईत घरात घुसून मित्रावर गोळीबार; नेमकं कारण काय?

सर्व जखमींवर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भिंवडी-वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे एका दुचाकीस्वाराला वाचविताना ट्रक चालकाने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली.

त्या वेळी मागून येणाऱ्या एक ट्रक व कार एकमेकांवर आदळत विचित्र अपघात होऊन दुचाकीच्या मागील बाजूस बसलेली पूर्वाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच तिचा मृत्यू झाला; तर विविध वाहनांतील नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Accident News
Crime News : नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून घेत जीवन संपवलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com