manase news
manase newsesakal

Mns News: मनसेचे डोंबिवली-कल्याणात नवचैतन्य रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये नवचैतन्य रॅलीचे आयोजन केले होते | On behalf of Maharashtra Navnirman Sena, Navchaitanya Rally was organized in Dombivli and Kalyan Gramin

Dombivali News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांची मोर्चेबांधणी व प्रचारास सुरुवात झाली आहे. मनसेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून, पाडव्याला मनसे अध्यक्ष ती जाहीर करणार आहेत.

त्या अगोदर कल्याण ग्रामीण व डोंबिवलीत रविवारी मनसेच्या वतीने नवचैतन्य रॅली काढण्यात आली. एकप्रकारे त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. मनसेचे हे शक्तिप्रदर्शन नेमके काय दर्शवते? कल्याण लोकसभेत उमेदवार देणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

manase news
MNS Party : अठराव्या वर्षांतल्या ‘मनसे’कडे सर्वांचे लक्ष; राज ठाकरे यांची आज जाहीर सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये नवचैतन्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. नवचैतन्य बाईक रॅलीतून एकप्रकारे कल्याण लोकसभेत मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह पाहता पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका मांडताना लोकसभा निवडणूक लढवणे आणि उमेदवारांची घोषणा करणार का? की कल्याणच्या जागेवर दावा करणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

manase news
Kolhapur MNS : 18 वर्षे झाली तरी, मनसेची अस्तित्वासाठीच लढा; स्थानिक पातळीवर ताकदीच्या नेतृत्वाची गरज!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com