Devendra Fadanvis modi
Devendra Fadanvis modi sakal

Devendra Fadanvis: राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला इंजिन, मात्र त्या इंजिनला डबेच नाहीत, फडणवीसांचा हल्लाबोल

बदलापूर शहरात मंगळवारी (ता. ९) झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते |

Devendra Fadanvis: भारताच्या अर्थव्यवस्थेला मोदींच्या नेतृत्वाखाली बळकटी मिळाली. जगात ११व्या स्थानावरून अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. कारण देशाचे नेतृत्व करणाऱ्या मोदींचे प्रेरणास्थान हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.(Devendra Fadanvis on narendra Modi)

महाराजांनी राज्याभिषेक जरूर करून घेतला; पण ते राजगादीवर बसले नाहीत, तर त्यांनी अहोरात्र स्वराज्यातील जनतेची सेवा केली. हीच सेवा गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी देशासाठी करत आहेत. आपल्या महायुतीच्या विकासाच्या गाडीला मोदी नावाचे इंजिन आहे. Devendra Fadanvis in badlapur

Devendra Fadanvis modi
Devendra Fadanvis: मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून अन् दोन साथीदारांना घेऊन- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधींच्या इंडिया आघाडीला इंजिन तर आहे, मात्र त्या इंजिनला डबेच नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते बदलापूर शहरात मंगळवारी (ता. ९) झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.

२०२४ची लोकसभा निवडणूक ही भारताला मजबूत करण्याची निवडणूक आहे. महायुतीच्या गाडीला विकासाचे डबे आहेत, या गाडीला मोदी नावाचे भक्कम इंजिन आहे. ही महायुतीची गाडी विकासाच्या दिशेने भरधाव जात आहे.(kapil patil speech in badlapur)

Devendra Fadanvis modi
Devendra Fadanvis: शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघाला सरकारची मोठी भेट ?

मात्र दुसरीकडे राहुल गांधींच्या इंडिया आघाडीचे इंजिन मात्र भरकटलेले आहे. राहुल गांधी हे त्यांच्या बऱ्याच सभा, मेळावे, भेटीगाठी या ठिकाणी जाऊन हे सांगत असतात की, मतदानाच्या दिवशी जनतेने बोट कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर दाबले तरी, सगळी मते मात्र कमळाला जातात. खरे तर देशातील प्रत्येक घरातील नागरिकाला देशाचे पुढील नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदी हेच हवे आहेत. loksabha election rally 2024

मोदींच्याच नेतृत्वाखाली राज्यातील महायुतीच्या सरकारनेदेखील राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास केल्याचे म्हटले. गेल्या पाचशे वर्षात जे कोणाला जमले नाही ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले. अयोध्येत प्रभू श्री रामांना स्थापित केले, त्यामुळे देशातील जनतेकडून नरेंद्र मोदींना नक्कीच आशीर्वाद मिळणार आहेत. पुन्हा एकदा विजयाची गुढी संपूर्ण देशामध्ये उभारली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. (BJP news maharashtra)

Devendra Fadanvis modi
Devendra Fadanvis Nashik Daura : राज्यातील पहिल्या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे आज लोकार्पण

जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण


फडणवीस यांनी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले. तसेच यावेळी किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या मेळाव्यात भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, बालाजी किणीकर, वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, शरद तेली, किरण भोईर, रमेश सोळसे, दृष्टी मित्र साकीब गोरे व मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते.(Kapil Patil, Shrikant Shinde, Public Works Minister Ravindra Chavan, MLA Kisan Kathore, Balaji Kinikar, Vaman Mhatre, Former Mayor Ram Patkar, Rajendra Ghorpade, Sambhaji Shinde, Sharad Teli, Kiran Bhoir, Ramesh Solse, Drishti Mitra Saqib Gore.)

Devendra Fadanvis modi
Devendra fadanvis: फडणवीसांचा 'मी पुन्हा येणार'चा व्हिडिओ चर्चेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com