Devendra Fadanvis Nashik Daura : राज्यातील पहिल्या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे आज लोकार्पण

राज्यातील पहिले दिव्यांग प्रशिक्षण व विविध उपचार सेवा सुविधा केंद्र तयार झाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
disable person
disable person esakal

Devendra Fadanvis Nashik Daura : प्रभाग २३ मधील भारतनगर येथे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यातील पहिले दिव्यांग प्रशिक्षण व विविध उपचार सेवा सुविधा केंद्र तयार झाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

अटल स्वाभिमान भवन या प्रशिक्षण व उपचार केंद्रामध्ये तळमजला व चार मजले आहेत. (Inauguration of first disability training center in state today by devendra fadnavis nashik news)

त्यात तळमजल्यावर प्रवेश क्षेत्र, बैठक हॉल, ऑडिओ टेस्टिंग आणि स्पीचथेरपी सेंटर, फिजिओथेरपी सेंटर, स्वीमिंग पूल, टॉयलेट बाथरूम याचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर प्रशिक्षण खोल्या असून, ॲक्टिव्हिटी रूम टाकून टॉयलेट बांधकाम आहे. दुसऱ्या मजल्यावर फ्री ऑफिसर सेंटर, मल्टीपर्पज डिसॲबिलिटी कक्ष, संगणक कक्ष, ट्रेनिंग रूम आहे.

disable person
Devendra Fadanvis Nashik Daura : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या विविध कार्यक्रम

तिसऱ्या मजल्यावर प्रोजेक्टर रूम, संगीत खोली, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, ट्रेनिंग रूम आहे. चौथ्या मजल्यावर मल्टीपर्पज हॉल, लायब्ररी स्टोअर रूम, ड्रेसिंग रूम, टॉयलेट व बाथरूमची सुविधा आहे. या वास्तूचा राज्यातील दिव्यांगांना उपयोग होणार आहे.

वास्तूचे भूमिपूजन आमदार देवयानी फरांदे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेविका रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, चंद्रकांत खोडे यांच्या हस्ते झाले होते. या वास्तूचा लोकार्पण सोहळा होत असून कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहे, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.

disable person
Devendra Fadanvis Nashik Daura : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जलरथाचे उद्या उद्‍घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com