Kokan Political News: लोकसभा प्रचारादरम्यान साहित्य खर्चासाठी दर निश्चिती; आयोगाची करडी नजर

Kokan Political News: लोकसभा प्रचारादरम्यान साहित्य खर्चासाठी दर निश्चिती; आयोगाची करडी नजर

Panvel News : लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून निवडणुकीला लागणाऱ्या साहित्याचे दर निवडणूक आयोगाकडून निश्चित केले आहेत. निवडणूक काळात उमेदवारांना खर्च करताना जेवढे दर ठरवून दिले आहेत. (loskabha 2024)

त्यानुसारच उमेदवाराला आपला खर्च निवडणूक विभागास सादर करावा लागणार आहे. विशेष म्‍हणजे, उमेदवारांच्‍या प्रचार सभेवर आयोगाची करडी नजर असणार आहे. यामुळे उमेदवाराला खर्च सांभाळूनच करावा लागणार आहे. (The commission is keeping a close eye on the campaign meeting)

Kokan Political News: लोकसभा प्रचारादरम्यान साहित्य खर्चासाठी दर निश्चिती; आयोगाची करडी नजर
Kalyan Political News: खा.कपिल पाटलांनी उडवली वैशाली दरेकरांची खिल्ली; वाचा नक्की काय झालं ते

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेची घोषणा केल्‍यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रचार सभा, रॅली, झेंडे, जाहिराती, दौरे या सर्व गोष्टींचे नियोजन पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून केले जात आहे. या सर्व गोष्टीसाठी पक्ष आणि उमेदवारांकडून वारेमाप खर्च केला जातो. मात्र, निवडणूक आयागाने या उधळपट्टीला एक मर्यादा घालून दिली आहे. निवडणूक काळात उमेदवाराने आणि राजकीय पक्षाने किती खर्च करायचा त्यासाठीचे दर निश्‍चिती करण्यात आली आहे.

प्रचारासाठी ढोल-ताशे लावले तर त्याचा दर साडेतीन हजार, फेटे बांधले तर त्याचा प्रत्येकी १०० आणि टोपी प्रत्येकी ४९ रुपये दर मंजूर करण्यात आला आहे. तसेच सभा, रॅलीवरसुद्धा पथकाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे उमेदवार आपला खर्च लपवू शकणार नाही, असे सांगितले जात आहे.

Kokan Political News: लोकसभा प्रचारादरम्यान साहित्य खर्चासाठी दर निश्चिती; आयोगाची करडी नजर
Jalgaon Political News : स्वाभिमान असेल तर खडसेंनी राजीनामा द्यावा : संजय पवार

शिवाय उमेदवाराला या सर्व बाबी लक्षात घेऊन खर्चाचा ताळमेळ बसवावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ९५ लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरविण्यात आली आहे. प्रचारादरम्यान होणाऱ्या दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणूक विभागास देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती पनवेल सहायक निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत काही वस्तूंमध्ये दुप्पट, तर काहींमध्ये ५० ते ६० टक्क्यांनी किमती वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या सभेवर निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. यामुळे उमेदवाराला खर्च सांभाळूनच करावा लागणार आहे. परिणामी, सभेसाठी अधिक खर्च झाला तर लागलीच दिसून येणार आहे.

Kokan Political News: लोकसभा प्रचारादरम्यान साहित्य खर्चासाठी दर निश्चिती; आयोगाची करडी नजर
Jalgaon Political News : भाजपच्या उमेदवार निश्‍चितीनंतर विरोधकांची नावे ठरणार!

त्यामुळे खर्च जरा जपूनच करावा, असे आवाहन राहुल मुंडके यांनी केले आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हे दर निश्चित केले आहे. महागाईचा फटका नेते मंडळींनाही या निवडणुकीत सहन करावा लागणार आहे. २०१९च्या निवडणुकीत काही बाबींचा समावेश नव्हता. त्याचा समावेश यंदा करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.(Some items were not included in the 2019 elections)


खर्चाचा प्रकार
चहा १० रुपये
कॉफी १२ रुपये
समोसा १५ रुपये
उपमा/पोहे - २० रुपये
खिचडी/मसाले भात - २५ रुपये
शाकाहारी जेवण - २०० रुपये
चिकन राईसप्लेट - २३० रुपये
मटण राईस प्लेट - ३३० रुपये
चिकन बिर्याणी - २०० रुपये
मटण बिर्याणी- ३०० रुपये
टोपी - ४० रुपये
शाल - ४० रुपये
साऊंड सिस्टिम - २,४०० रुपये
ढोल-ताशा संच - ३,५०० रुपये
फेटा - १००/२०० रुपये
जनरेटर - १ ते १० हजार रुपये

Kokan Political News: लोकसभा प्रचारादरम्यान साहित्य खर्चासाठी दर निश्चिती; आयोगाची करडी नजर
Nashik Political News : देवळाली मतदारसंघासाठी 3 कोटीचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com