Mumbai News: यंदा मुंबईच्या लोकसभेच्या रिगंणातून महिला उमेदवार हद्दपार?

Mumbai News: यंदा मुंबईच्या लोकसभेच्या रिगंणातून महिला उमेदवार हद्दपार?

मृणाल गोरेंसारख्या फायरब्रँड महिलांना लोकसभेत पाठवणाऱ्या मुंबईतून यावेळी निवडणूक रिंगणात महिला उमेदवार नसण्याची शक्यता आहे.

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा


Mumbai News: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही महिला उमेदवाराला संधी मिळाली नाही.

दुसरीकडे एकमेव विद्यमान महिला खासदाराचे तिकीटही कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृणाल गोरेंसारख्या फायरब्रँड महिलांना लोकसभेत पाठवणाऱ्या मुंबईतून यावेळी निवडणूक रिंगणात महिला उमेदवार नसण्याची शक्यता आहे. (no women candidate in mumbai 6 loksabha)


मुंबईकरांनी जयवंतीबेन मेहता, प्रिया दत्त, पूनम महाजनसमवेत अनेक महिला प्रतिनिधी लोकसभेत पाठवले आहे. यावेळी मात्र ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ वगळता इतर पाच लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (ठाकरे गट), भाजप या प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झालेत. मात्र, या यादीत एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही.


दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट) गेल्यामुळे गायकवाड यांची संधी हुकली. उत्तर मुंबईतून शिवसेनेच्या वतीने तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, ही जागा काँग्रेसकडे गेल्यामुळे ही शक्यताही मावळली आहे.

Mumbai News: यंदा मुंबईच्या लोकसभेच्या रिगंणातून महिला उमेदवार हद्दपार?
Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलिस गडचिरोलीत कर्तव्यावर; तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार

परंपरा मोडीत निघणार


गेल्या दीड दशकांहून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महिला करत आहे. भाजपच्या पूनम महाजन या दोन टर्म येथील खासदार आहेत. गेल्या वेळी मुंबईतून निवडून गेलेल्या त्या एकमेव महिला खासदार होत्या. मात्र, यंदा त्यांचे तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जाते. अजूनपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. त्यांच्याऐवजी आशिष शेलार, पराग आळवणी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, स्वरा भास्कर यांची नावे चर्चेत असली तरी नसीम खान, भाई जगताप, राज बब्बर यांच्यापैकी कुणाच्यातरी गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास या मतदारसंघात पुरुषराज सुरू होईल.

Mumbai News: यंदा मुंबईच्या लोकसभेच्या रिगंणातून महिला उमेदवार हद्दपार?
Navi Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमा थंडावणार; हे आहे महत्वाच कारण!

महिलांना मिळालेली मते


२००९
- प्रिया दत्त (काँग्रेस) - ३ लाख १९ हजार (उत्तर मध्य मुंबई)
- शिल्पा सरपोतदार (मनसे) - १ लाख ३२ हजार (उत्तर मध्य मुंबई)
- शालिनी ठाकरे (मनसे) - १ लाख २४ हजार (उत्तर पश्चिम मुंबई)

२०१४


- पूनम महाजन (भाजप) - ४ लाख ७८ हजार (उत्तर मध्य मुंबई)
- प्रिया दत्त (काँग्रेस) - २ लाख ७१ हजार (उत्तर मध्य मुंबई)
- मेधा पाटकर (आप) - ७१ हजार (ईशान्य मुंबई)
- निहारिका खोंडले (व्हीबीए) - ६८ हजार (ईशान्य मुंबई)
- श्वेता पालकर (मनसे) - १ लाख ८ हजार

Mumbai News: यंदा मुंबईच्या लोकसभेच्या रिगंणातून महिला उमेदवार हद्दपार?
Mumbai Local News: एसी लोकलमध्ये फुकट्यांची घुसखोरी तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढली

२०१९


- पूनम महाजन (भाजप) - ४ लाख ८६ हजार (उत्तर मध्य मुंबई)
- प्रिया दत्त (काँग्रेस) - ३ लाख ५६ हजार (उत्तर मध्य मुंबई)
- उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) - २ लाख ४१ हजार (उत्तर मुंबई)

- जयवंतीबेन मेहता या मुंबईत वेगवेगळ्या मतदारसंघातून तीन वेळा तर मृणाल गोरे उत्तर मुंबईतून (१९७७) निवडून आल्या होत्या.


महिला अराक्षणाच्या गप्पा, महिलांचा मानसन्मान हे फक्त त्यांची मते मिळवण्यासाठीच आहे. त्यांना काही द्यायचे असेल तर हात आखडता घेतला जातो, ही खेदाची बाब आहे.
- विद्या चव्हाण, माजी आमदार


सध्या उमेदवारी देताना निवडून येईल, हाच निकष ठेवल्याचे दिसत आहे. स्त्री-पुरुष समानता, वैचारिक अधिष्ठान याला निवडणूक रिंगणात स्थान नसल्याचे दिसत आहे.
- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या

Mumbai News: यंदा मुंबईच्या लोकसभेच्या रिगंणातून महिला उमेदवार हद्दपार?
Mumbai Local News: एसी लोकलमध्ये फुकट्यांची घुसखोरी तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com