ST News
ST Newssakal

Mumbai ST News: उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईकरांची लालपरीला पसंती

Mumbai News: उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.(Mumbai Central, Paral, Kurla, Panvel, Uran )


उन्हाळी सुटीच्या दिवसांत गावाकडे जाण्यासाठी बस स्टँडवरील प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने यंदाही जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार अतिरिक्त बसच्या संगणकीय आरक्षणाला सुरुवात झाली असून मुंबई विभागात दिवसाला सरासरी ४४ हजार प्रवाशांची नोंदणी होत होती.

ST News
ST News: उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लालपरी सज्ज; सोडल्या जाणार अधिकच्या बसेस

मात्र, गेल्या दोन दिवसांत हा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. त्यात १३ एप्रिल रोजी ४८ हजार, तर १४ एप्रिल रोजी ५० हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यात ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास, ६५ ते ७४ वय असणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाशांना ५० टक्के सवलत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलतीमुळे ही संख्या वाढल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

ST News
ST News: मुंबई विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा

मुंबईतील वाहतूक आगार - गाड्यांची संख्या


मुंबई सेन्ट्रल - ४७
परळ - ७१
कुर्ला - ४२
पनवेल - ५३
उरण - ४३

आगार - उत्पन्न
मुंबई सेन्ट्रल - ९७. ०८ लाख 
परळ - २.२३ कोटी 
कुर्ला - ७३.६६  लाख 
पनवेल - ७३. ७४ लाख 
उरण - ५२. २ लाख 
एकूण उत्पन्न - ५.२० - कोटी

ST News
ST Bus Accident : एसटी बस उलटून १४ जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com