crime
crimesakal

Crime News: शिक्षिकेचे इनक्रमेंट होत नाही म्हणून पतीने केला मुख्याध्यापकावर हल्ला

तत्काळ लक्ष घालत फरारी आरोपी शकील शेखला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dombivali Crime News: शिक्षिका असलेल्या पत्नीचे इन्क्रिमेंट होत नसल्याच्या रागातून पतीने शाळेच्या मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली जीआरपी पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकील शेख याला अटक केली आहे.

crime
Nashik Crime News : चाकूचा धाक दाखवून जबरी लुट! कॉलेजरोडवरील घटना; वृद्धावर चाकूने वार

मिनाज शेख या खारबाव येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शेख यांची सर्व्हिस बुकात नोंद केली जात नव्हती. त्यामुळे त्यांचे इन्क्रिमेंट होत नव्हते. यावरून शेख आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद होत हाेता. अनेक वेळा विनंती करूनदेखील शेख यांची विनंती मान्य केली जात नव्हती. शेवटी त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला. त्याचा राग अनावर झाला.

शिक्षिकेचा पती शकील शेख याने मुख्याध्यापक भागवत गुरव यांना दिवा वसई मार्गावरील खारबाव रेल्वे स्टेशनजवळ गाठून त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यानंतर कल्याणच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

crime
Nashik Crime News : दामदुप्पट योजनेतून 2 कोटींचा गंडा! मुख्य संशयिताला अटक; तक्रारींसाठी पोलिसांचे आवाहन

भागवत गुरव हे कल्याणला राहणारे असून ते दररोज कल्याण ते खारबावला असा प्रवास करतात. त्यांच्या या प्रवासाच्या वेळेची शकील शेख याला माहिती होती. ती वेळ साधतच शकीलने रेल्वे रेल्वे स्टेशनवर गुरव यांच्यावर हल्ला केला.

हल्ला केल्यानंतर शकीलने तेथून पळ काढला; परंतु डोंबिवली जीआरपी पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालत फरारी आरोपी शकील शेखला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

crime
Sambhajinagar Crime : तरुणीचे धर्मांतर करून मारहाण, अत्याचार ; ओळख लपवत चार लेकरांच्या बापाचा कारनामा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com