Loksabha News: अबब! सुनील तटकरेंची आहे तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता

Loksabha News: अबब! सुनील तटकरेंची आहे तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता

एकूण आठ कोटी ६२ लाखांची मालमत्ता असून पाच वर्षांत ४१ लाख ६२ हजारांची वाढ झाली आहे |The total assets are eight crore 62 lakhs and there has been an increase of 41 lakh 62 thousand in five years

Alibag News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार आहेत. तटकरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून त्यांच्याकडे चल आणि स्थावर अशी एकूण आठ कोटी ६२ लाखांची मालमत्ता असून पाच वर्षांत ४१ लाख ६२ हजारांची वाढ झाली आहे.


तटकरे यांच्या नावावर एक लाख १४ हजार ५२० रुपये कर्ज असून, एकही गुन्हा, खटला नसल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. तर त्‍यांची पत्नी वरदा यांच्या नावे ५ कोटी ९४ लाखांची एकूण मालमत्ता आहे. वडिलांकडून राजकीय वारसा लाभलेले सुनील तटकरे ३५ वर्षांहून अधिक काळ रायगड आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे.

सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे जलसंपदा मंत्री, काही काळ अर्थ मंत्री आणि सध्या खासदार म्हणून रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्याच्याबरोबर त्याची दोन्ही मुले सक्रिय राजकारणात आहेत.


सुनील तटकरे हे तिसऱ्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्राप्रमाणे तटकरे यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने, वाहन अशी चार कोटी १७ लाख १४ हजार रुपयांची चल संपत्ती आहे.

तर त्‍यांची पत्नी वरदा तटकरे यांच्याकडे एक कोटी २२ लाख ५७ हजारांची चल, तर चार कोटी ७२ लाख १७ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. वरदा यांच्या नावावर एक ट्रॅक्टर असून कोणतेही कर्ज नाही.


तटकरे दाम्‍पत्‍याची संपत्ती १४ कोटी


सुनील तटकरे आणि त्यांच्या पत्नी वरदा यांची एकूण संपत्ती १४ कोटी ५७ लाख ६८ हजार रुपये इतकी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे चल आणि स्थावर अशी एकूण १२ कोटी ७४ लाख ८७ हजार इतकी संपत्ती होती. पाच वर्षात दोघांच्या संपत्तीत एक कोटी ८२ लाख ८१ हजारांची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com